court  sakal media
पुणे

Pune : सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

जामिनासाठी मदत करण्यासाठी मागितले पाच लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्यासाठी एकाकडून पाच लाखांची लाच मागणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एक लाख रुपयांची लाच स्वीकारता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (ता. ८) ही कारवाई केली.

सहायक पोलिस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय ३२, रा. वडगाव शिंदे रस्ता) आणि संतोष भाऊराव खांदवे (वय ४६, रा. लोहगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचा जमीन -खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. व्यावसायिक कारणातून त्यांच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदारांच्या वडिलांना अटक झाली असून ते पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी पाटील यांच्याशी संपर्क केला होता.

जामिनाला विरोध न करण्यासाठी आणि अनुकूल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती. पाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी बुधवारी लोहगाव परिसरात पाठविले. त्यावेळी विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

खांदवे याने रक्कम कोणाकोणासाठी घेतली होती? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तपासात दोघेही सहकार्य करीत नसल्याने त्यांना विश्‍वासात घेऊन तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल रमेश घोरपडे यांनी केली होती. विभागाचे पोलिस निरीक्षक सुनिल क्षीरसागर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT