पुणे

पोलिस निरीक्षकांना अॅट्रोसिटीची धमकी; एकास अटक

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्या अंगावर धावून त्यांच्याविरूध्द अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करु आणि त्यांना धमकी देत दमदाटी करणाऱ्या दादा जाधव यास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार असिफ शेख यांनी आज (ता. 5) याबाबत माहिती दिली. दादा शिवाजी जाधव (वय ४८, मूळ रा. जांब, ता. इंदापूर, सध्या रा. दौंड) असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, तो एका संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक म्हणून काम पाहत आहे. सोनवडी (ता. दौंड) येथील एका युवतीचा 13 आॅक्टोबर 2018 रोजी साखरपुडा झाल्यानंतर तिच्या आईने सासरच्या मंडळींविरूध्द हुंडा मागितल्याचा आणि त्यांच्यापैकी एकाने टिळ्याच्या कार्यक्रमात युवतीचा विनयंभग केला, अशा आशयाची तक्रार 17 जानेवारी 2019 रोजी दौंड पोलिसांकडे केली होती.

सदर तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात सत्यता नसल्याची बाब पुढे आली. दरम्यान, या प्रकरणात कोणताही थेट संबंध नसताना फक्त युवतीच्या कुटुंबीयांसमवेत एका जमिनीच्या व्यवहारात संपर्क होता. त्यामुळे दादा जाधव याने 4 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता दौंड पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर त्याने पोलिस निरीक्षक यांना युवतीच्या आईने दिलेल्या तक्रार अर्जानुसार सासरच्या लोकांविरूध्द विनयभंग व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पोलिसांनी त्यास नकार दिल्यानंतर दादा जाधव याने पोलिस ठाण्यात सुनील महाडीक यांच्या अंगावर धावून त्यांच्याविरूध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) कायद्यातील कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली. त्याचबरोबर युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करून तिला त्या प्रकरणात पोलिस निरीक्षकांचे नाव घेण्याची धमकी दिली. याबाबत सुनील महाडीक यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आज (ता. ५) दौंड न्यायालयात दादा जाधव यास हजर केले असता त्यास एक दिवसासाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. फौजदार प्रकाश खरात पुढील तपास करीत आहे. 

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबावतंत्र

सशस्त्र पोलिस सुरक्षा असल्याने त्याचा वादग्रस्त जमिनींच्या व्यवहारांसाठी दादा जाधव हा उपयोग करून घेत असून, कोणी जाब विचारल्यास त्याच्याकडून पोलिसांकडे खोटे तक्रार अर्ज देऊन दबाव टाकलो जातो. स्वतःच्या जमिनीच्या व्यवहारातील लाभासाठी युवतीच्या साखरपुडा प्रकरणात देखील खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी त्याने प्रयत्न केल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT