Crime1.jpg 
पुणे

पुणे : विश्रांतवाडीत पाच ते सहा जणांनी केला त्याच्यावर हल्ला अन्‌ पहा पुढे घडले असे

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : विश्रांतवाडी येथील चव्हाण चाळ येथे आज 10 मे रोजी सायंकाळी 6 च्या आसपास कुमार शांताराम देवकर (वय 35 रा. 112 वडारवाडी, विश्रांतवाडी) या तरुणावर 5 ते 6 लोकांनी हल्ला केला.

ज्यामध्ये कुमार शांताराम देवकर हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना चव्हाण चाळ येथे स्मशानभूमीच्या रस्त्यावर सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. यात पूर्वीच्या भांडणावरून कुमारला दांडक्‍याने, दगडाने आणि बाटलीने मारण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार कुमार देवकर याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्हाची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला 2017 ते 2019 या 2 वर्षाकरिता पुणे शहर व पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केले होते 

प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला किरकोळ वादातून झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उप आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड तसेच गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम यांनी तत्परता दाखवत फक्त 2 तासाच्या आत या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे - राजा अन्वर डिसूझा (वय 23 वर्ष, रा. वडारवस्ती), यश ऊर्फ जाबाद अन्वर डिसूझा (वय 21 वर्ष, रा. वडारवस्ती), प्रेम मिलिंद माने (वय 19 वर्ष, रा. भीमनगर), अनिल उत्तम औताडे (वय 21 वर्ष, रा. भीमनगर), परशुराम विलास जाधव (वय 21 वर्ष, रा. चव्हाण चाळ). या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप यादव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT