Attack by sharp weapon on the couple over financial dispute 
पुणे

आर्थिक वादातून दांम्पत्यावर धारदार शस्त्राने वार; दोघे गंभीर जखमी 

सकाळवृत्तसेवा

पुणे ः आर्थिक व्यवहाराच्या वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने दाम्पत्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी चौघांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील सई हेरीटेज या ठिकाणी घडला. 

याप्रकरणी माधुरी सांगळे (वय 31, रा. सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. फिर्यादीची सासू व त्यांची मावस सासू यांच्यात चार महिन्यांपुर्वी झालेल्या आर्थिक व्यवहारावरुन वाद झाले होते.

शरद पवारांच्या शब्दाचं वजन पाहा; एका पत्रावर 'या' नेत्याची नजरकैदेतून सुटका

दरम्यान, फिर्यादीचे पती सागर व त्यांच्या ओळखीच्या मीना दिवटे, आकाश जालीने असे चौघेजण शुक्रवारी दुपारी एक वाजता त्यांच्या घराजवळ गप्पा मारत होते. फिर्यादीचे पती सागर हे त्यांच्या वडीलांशी मोबाईलवरुन बोलत होते. त्यावेळी त्यांच्याघरोसमोर दुचाकीवरुन आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी जुन्या आर्थिक वादातुन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्यासह त्यांच्या पतीच्या डोक्‍यात धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज अभंग करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT