Women Rickshaw Driver, Pune Crime News esakal
पुणे

Pune News: संतापजनक! पुण्यात महिला रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न; नग्न अवस्थेत प्रवाशानं केला महिलेचा पाठलाग

पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आलीये. येथील महिला रिक्षा चालकावर (Women Rickshaw Driver) बलात्काराचा प्रयत्न झालाय. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीनं रिक्षा चालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.(Pune Crime News)

ही घटना पुण्यातील कात्रज घाटात (Katraj Ghat Pune) घडलीये. रिक्षा चालक महिलेनं आरोपीला विरोध केला असता, त्यानं संपूर्ण कपडे काढून, नग्न अवस्थेत या महिलेचा कात्रज घाटात पाठलाग केला. या प्रकरणी 38 वर्षीय महिला रिक्षा चालकानं तक्रार दिली आहे. निखिल अशोक मेमजादे (30) असं अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या रिक्षा चालक आहेत. 26 रोजी आरोपी रात्रीच्या सुमारास कात्रज घाटात जायचं आहे, असं सांगून रिक्षात बसला. दरम्यान, कात्रज घाटातील एका लॉजिंगजवळ रिक्षा थांबून त्यानं महिला चालकाला जेवणासाठी जबरदस्ती केली. मात्र, या महिलेनं नकार दिल्यानंतर त्यानं तिला मारहाण करत तिच्याकडं शारीरिक संबंधाची मागणी केली.

यावरच आरोपी थांबला नाही तर त्यानं त्याचे सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत रिक्षात बसला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महिला कात्रज घाटात पळून जात असताना आरोपीनं नग्न अवस्थेत तिचा पाठलाग केला. या महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता हा सगळा प्रकार घडला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलीये. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT