Cemetery 
पुणे

मलाईसाठी नगरसेवक आणि प्रशासन अधिकाऱ्यांचे लक्ष आता स्मशानभूमी

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील ४७ स्मशानभूमीचा तेही दुरुस्तीचा खर्च हा तब्बल १५ ते १८ कोटी रुपयांचा आहे. एवढाच नाही तर तिथल्या सुविधांचा खर्चाचा हिशेब लागत नाही. म्हणजे पुण्यात नगरसेवक आणि प्रशासनातले अधिकारीही स्मशानावरच्या खर्चातच सर दाखवतात.

महापालिकेच्या भवन रचना खात्यासह वॉर्डस्तरीय निधीतूनही वर्षाकाठी केवळ स्मशानभूमीत दुरुस्तीची कामे दाखवली जात आहेत. त्यातून एका स्मशानभूमीसाठी १५ लाख रुपयांपर्यंत निधी ओतला जातोय. कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे महापालिकेची तिजोरी रिकामी झालीय. म्हणून गरजेचीच कामे करण्याचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा आदेश आहे. ज्यामुळे अनावश्यक कामांवर पैशांची उधळपटी होणार नाही, अशी आशा आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिन्याला सव्वाचार हजार मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. वर्षाकाठचा हा आकडा ५० ते ५५ हजारापर्यंत आहे, त्यामुळे तेथील विद्युत वाहिन्या, गॅस दाहिन्यांची व्यवस्था आहेत. तसेच, पारंपरिक पद्धतीनेही अंत्यसंस्काराची सोय आहे. त्यासाठी विविध कामे केली जातात. ही कामे वर्षभरातून एकदा अपेक्षित आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून कामे वाढविण्यात येत आहेत. त्यातून भरमसाट खर्चाच्या निविदा काढून त्या मंजूरही करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

कामांची गरज आहे का?
महिनाभरात मोजक्याच भागांतील स्मशानभूमीसाठी तीन कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. काही निविदांवर आक्षेप घेताच, त्यासाठीच्या फेरनिविदाही काढल्या गेल्या आहेत. त्यात, नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांसह महापालिका प्रशासनानेही त्या निविदा काढल्या आहे. त्यात विद्युत विभागाकडूनही कामे करण्यात येत असल्याचे आरोग्य खाते सांगत आहे. अशा कामांची कितपत गरज असते, ते माहीत नाही. पण ती केली जात आहे. आरोग्य खाते त्याला केवळ मंजुरी देत असल्याचे सांगण्यात आले.

एकूण स्मशानभूमी - ६०
कब्रस्तान, दफनभूमी - ३०
वर्षातील मृत - ५० हजार
दुरुस्ती खर्च - १८ कोटी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT