पुणे

आपल्या हद्दीत पैसे का द्यायचे? महिला पोलिस अधिकाऱ्याचा Audio viral

शरयू काकडे

पुणे : पुण्यात कधी काय घडेल याचा नेम नाही. आता पर्यंत तुम्ही पैसे खाण्यांबाबत ऐकले असेल पण खाण्यासाठी पैस न देणाऱ्यांबाबत ऐकले आहे का? असाच काहीसा प्रकार पुण्यात घडल्याचे समोर आला आहे. सध्या महिला पोलिसाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमधील महिला पोलिस अधिकारी मटन बिर्याणी, कोळंबी, बोंबीलची ऑर्डर देत आहे पण हे सर्वकाही त्यांना मोफत हवे आहे. फुकट बिर्याणी मागणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या ऑडिओ क्लिपमुळे संबधित पोलिसांवरच प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यात एका महिला पोलिस अधिकाऱ्याची आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा संवादाची ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे. या महिला आधिकाऱ्याला एसपीजची साजूक तुपातील बिर्याणी हवी पण फुकटमध्ये''. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमुळे पोलिस देखील हॉटेलकडून वसूली करतायेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय आहे ऑडिओ क्लिपमधील संवाद

या ऑडिओ क्लिपमधील महिला पोलिस अधिकारी, ''विश्रामबागच्या हद्दीत नॉनव्हेज खूप चांगलं कुठे मिळते'' असे विचारत आहे. त्यावर, ''एसपीजची साजूक तुपातील बिर्याणीआणि कोल्हापूरची मटण थाळी चांगली मिळते. असे फोनवरील पोलिस कर्मचारी सांगतो. त्यानंतर, ''बिर्याणी घरी पाठवून द्या आणि हिशोबाचे काही असेल तर स्थानिक पीआयला सांगा'' असे महिला पोलिस अधिकारी त्या पोलिस कर्मचाऱ्याला सांगते. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने ''आपण आधी असे कधी केले नाही. आपण कॅश देतो'' असे सांगितल्यावर, संबधित महिला पोलिस अधिकारी, ''आपल्या हद्दीमध्ये आपण का पैसे द्यायचे" असे उत्तर देत आहे. त्यांनतरही संबधित महिला पोलिस अधिकारी, प्रॉन्स आणि बोंबील कुठे मिळेल अशी विचारणा करत आहे.

दरम्यान, याबाबत महिला पोलिसांसोबत संवाद साधला असता, ''हा कॉल 7-8 महिन्यांपूर्वीचा आहे. माझ असे मत नव्हतं. माझ्याविरोधात जाणूनबुजून कोणतरी हे केले आहे.''अशी माहिती एबीपी माझा या वृत्तसंस्थेला दिली आहे. सध्या पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्या सुरु असल्यामुळे त्याचा राग व्यक्त करण्यासाठी कोणीतरी व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, व्हिडिओ जुना असला किंवा कोणीतरी जाणूनबुजून व्हायरल केला असला तरी पोलिसांनी फुकट बिर्याणी मटणची मागणी करणे हे चुकीचे आहे अशी चर्चाही सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहचला असून याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज बैठक बोलवली आहे. ''ऑडिओ क्लिप खरी आहे का? याची तपासणी केली जाईल. या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल'' असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT