ca
ca 
पुणे

रिक्षावाल्याची मुलगी झाली सीए 

विठ्ठल तांबे

पुणे  : हलाकीच्या परिस्थितीत जिद्द व मेहनतीच्या जोरावर धायरीतील स्नेहा गायकवाड ही रिक्षावाल्याची मुलगी सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या स्नेहाने दहावीपर्यंतचे शिक्षण ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम शाळेत पूर्ण केले. वाणिज्य शाखेची पदवी स. प. महाविद्यालयातून घेतले. पुढचे शिक्षण तिने नोकरी करून पूर्ण केले. 

स्नेहाचे वडील शैलेश गायकवाड हे रिक्षा चालवतात व इलेक्‍ट्रिशियनचे देखील काम करतात, तर आई आरती गायकवाड गृहिणी आहे. दोन भावंडांत सर्वांत मोठी आहे. तिने "एन्ट्रन्स सीपीटी कॉमन प्रोफिसिएन्सी' परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली. प्रचंड इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. नोकरी करत तिने परीक्षेआधी बारा ते अठरा तास अभ्यास केला. परिसरातील नागरिक व मित्रमंडळींकडून तिचे कौतुक होत आहे. 

''नोकरी करत फावल्या वेळात सेल्फ स्टडीवर भर देत नियमित अभ्यास केला. मुख्य परीक्षेच्या दोन महिनेआधी कामाला रजा टाकून चौदा तास अभ्यास केला. आई-वडिल व भावंडांकडून कायमच प्रोत्साहन मिळाले व रायकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे यश संपादित केले. मी मागच्या परीक्षेला तीन वेळा अपयशाला सामोरे गेले होते; परंतु अधिक परिश्रम घेऊन परीक्षा पासच व्हायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले असल्याने आज यश गाठता आले.'
- स्नेहा गायकवाड

''माझ्या हलाकीच्या परिस्थितीमुळे मला इच्छा असूनही शिक्षण घेता आले नाही; मात्र माझ्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावे व चांगल्या नोकरीस लागावे हे आमचे स्वप्न स्नेहाने सीएची परीक्षा पास होऊन पूर्ण करून दाखविले. परिस्थिती हलाखीची असल्याने मुलांच्या शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणाकरिता तुटपुंजा पैसे होता; मात्र हार मानली नाही.'
- शैलेश गायकवाड, वडील 


 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT