Avoid Social Distancing and Use mask when step out from house  
पुणे

नागरिकांनो, कोरोना अजुन गेलेला नाही, घरबाहेर पडताना 'या' 2 गोष्टी सक्तीने पाळा !

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : मागील बहात्तर तासात बावीस कोरोनाबाधित रुग्ण तर, दिडशेहून अधिक क्वारांटाईन अशी गंभीर परिस्थिती सध्या उरुळी कांचन, थेऊर, कुंजीरवाडीसह पुर्व हवेलीत निर्माण झाली आहे. तरीही पुर्व हवेलीमधील बहुतांश नागरीक मात्र, सर्रास विनामास्कच फिरत असल्याचे दिसुन येत आहेत. तसेच, गर्दी असो वा नसो सोशल डिस्टन्सचा तर कधीच फज्जा उडाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पुर्व हवेलीमधील नागरीकांना कोरोनापासुन कायमस्वरुपी दुर राहायचे असेल तर नागरिकांनी घराबाहेर पडतांना सक्तीचा मास्क वापरण्याबरोबरच, गर्दीत सोशल डिस्टन्स सक्तीने पाळावे असे आवाहन हवेली तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी केले आहे.''घराबाहेर पडल्याबरोबर सक्तीचा मास्क तर गर्दीत सोशल डिस्टन्स या दोन्ही गोष्टी पाळा व कोरोनाला कायमचा टाळा'', असेही डॉ. खरात यांनी स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
उरुळी कांचन, थेऊर, लोणी काळभोर, कुंजीरवाडीसह पुर्व हवेलीमधील सहा गावात मागील बहात्तर तासात तब्बल बावीस रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात वरील बावीस जनांच्या संपर्कात आलेल्या दिडशेहुन अधिक जणांना होम क्वारंटाईन केले आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी वरील बावीस जनांच्या संपर्कात आलेल्या आनखी पन्नासहुन अधिक जनांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पाठवले आहेत.अशा गंभीर परीस्थितीतही नागरीक मात्र, बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसुन येत आहे. या पार्श्वभुमीवर डॉ. खरात यांनी वरील आवाहन केले आहे. 

विज बिलाबाबत शंका वाटतेय? तर...
याबाबत बोलतांना डॉ. सचिन खरात म्हणाले, ''शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यापासुन, नागरिक कोरोनाच पळला या समजुतीने बिनधास्तपणे फिरत आहेत. याचाच परिणाम पुर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळुन येण्यावर झाला आहे. नागरिकांनी केवळ मास्कचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळु शकतो. मात्र, नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. याबाबत पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीनाही मास्कचा वापर न करणाऱ्यांना दंड आकारण्याच्या सुचना केलेल्या आहेत. 

पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य​

कोरोना वाढत असतांना पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनही ढिम्म 
दरम्यान, पुर्व हवेलीत कोरोना वेगाने वाढत असतांना, अपवाद वगळता सर्वच ग्रामपंचायतींचे प्रशासन ढिम्म असल्याचे दिसुन येत आहे. रुग्ण आढळून येताच, महसुल खाते रुग्ण आढळुन आलेला भाग कंटेंमेन्ट असल्याचे जाहीर करण्याशिवाय दुसरे काही उपाय योजना करत नाही. जागोजागी भाजीपाला विक्री करणारे विक्रते व भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचे दिसुन येत असतानाही, पोलिस यंत्रना मात्र, पाहण्याशिवाय दुसरी काहीही भुमिका घेत नसल्याचे आढळून येत आहे. ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस खाते व आरोग्य विभाग यांनी एकत्र येऊन, प्रभावी उपाय योजना करत नाही तोपर्यंत पुर्व हवेलीत रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढणार ही काळ्या दगडावरची रेघ असणार आहे.

किरण राज यादव बारामती नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT