पुणे

अवलियाचा अवतार आणि गाडी पाहून लोकं त्यांच्याकडे पाहतच राहतात...

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी एक अवलिया दिवस रात्र कोणताही स्वार्थ नसताना मतदानाबाबत जनजागृती करीत आहे. अंगात पांढरा शर्ट, डोक्यावर टोपी, मोटरसायकल, जनजागृतीसाठी तिला लावलेला झेंडा अशा स्वरूपात तो "मतदारराजा जागा हो लोकशाहीचा धागा हो" असा संदेश देत आहे. 

बापूराव दगडोपंत गुंड (वय ५५ रा.फुरसुंगी, ता. हवेली)  असे या अवलीयाचे नाव आहे. आपली वेशभूषा आणि नागरिकांशी संवाद साधून चौका चौकात जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना मतदान करण्याचे महत्व पटवून देत आहेत. 

फुरसुंगीचे रहिवासी असणारे गुंड सध्या निवडणूक असणाऱ्या ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी अंगावर परिधान केलेला पांढऱ्या रंगाचा कुर्ता आहे. त्यावरती जागे व्हा मतदारानो जागे व्हा, मतदानाचा हक्क बजवा आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नका अशी घोषवाक्ये रंगीबेरंगी अक्षरात कुर्त्यावर लिहून माथ्यावर मतदारांनो जागे व्हा, मतदानाचा हक्क बजवा अशी पाटी लावली आहे. प्रत्येक निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी समाजात जनजागृती करीत असल्याचे गुंड यांनी सांगितले.

मोठ्या मोठ्या शहरातील चौकात शिट्टी वाजवून नागरिकांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदानाविषयी माहिती देतात. देशात अनेक ठिकाणी कमी प्रमाणात मतदान होत असल्याने जनजागृती करीत आहेत. गुंड यांनी विविध मागण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रत्येकाला मतदानाची सक्ती करावी, निवडणूक काळातील गैरप्रकार थांबवावेत, तसेच निवडणुकीतील अनामत रक्कम कमी करावी अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणत्याही आमिषाला बळी न पडता, प्रत्येकाने देशहितांसाठी प्रामाणिकपणे मतदान केले पाहिजे आजचा विचार न करता, पुढील ५० वर्षाचा विचार करून मतदान करावे तसेच देशाच्या हितासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे.-बापूराव गुंड, समाजसेवक.

(संपादन : सागर डी. शेलार) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT