Students_Exam 
पुणे

बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो प्राॅक्टर्डबाबत झाला मोठा निर्णय; परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बॅकलॉग, श्रेणीसुधार, बहिस्थ अभ्यासक्रमांच्या अंतिमपूर्व वर्षाच्या परीक्षेत गैरव्यवहार होऊ नये, यासाठी प्राॅक्टर्ड मेथडचा वापर केला जाणार होता, पण तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्यांचा विरोध यामुळे प्राॅक्टर्ड ऐवजी इतर माध्यमातून परीक्षेवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान परीक्षा ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत, याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्यानंतर आता अंतिमपूर्व वर्षातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. सुमारे १९ हजार विद्यार्थ्यांनी श्रेणीसुधारसाठी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. बॅकलॉग, श्रेणीसुधार या परीक्षा केवळ ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. 

ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅब यापैकी काहीच नाही, त्यांनी आपल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात जाऊन, तेथील संगणक कक्षातील सुविधेचा वापर करून ऑनलाईन परीक्षा द्यावी, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत घेण्यात येणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

दरम्यान, अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक मर्यादांचा गैरफायदा घेत कॉपी प्रकार घडले आहेत. याची पुनरावृत्ती बॅकलॉकच्या परीक्षांमध्ये होऊ नये यासाठी विद्यापीठाने ही परीक्षा प्राॅक्टर्ड प्रणाली वापरली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते, पण नेटवर्क प्रोब्लेममुळे परीक्षा देताना विद्यार्थ्यांना जागेवरून उठावे लागले, परीक्षेसाठी स्थान बदलल्यास त्याचा परिणाम थेट निकालावर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी प्राॅक्टर्डला  विरोध केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्राॅक्टर्ड ऐवजी अन्य मार्गाने परीक्षेवर नियंत्रण ठेवता येईल का, याचा विचार सुरू केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Tourism Development: विदर्भात पर्यटनाला वाव, पण विकासाची दृष्टी हवी

SSC Exam : ‘आता आम्ही पुढं शिकतूय, तुम्ही बी शिका!’ दहावी परीक्षेला ताई, आई, आजींकडून जोरदार अभ्यास

Latest Marathi News Live Update : ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोप

Dudhwa Tiger Reserve: जंगलात दुर्मिळ संघर्ष! वाघाने केली महाकाय गेंड्याची शिकार ; नेमकी घटना काय?

Vitthal Mythological Story : श्री विठ्ठलाच्या कानात मासे का अडकवलेले असतात? जाणून घ्या यामागचे आश्चर्यकारक कारण..

SCROLL FOR NEXT