Students_Exam 
पुणे

बॅकलॉगवाल्यांची अॅडमिशनवेळी होतेय अडवणूक; राज्य शासनाच्या आदेशाला महाविद्यालयांनी फासला हरताळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे माझी परीक्षा झालेली नाही, त्यामुळे माझे बी.कॉम. द्वितीय वर्षाचे दोन विषय तसचे राहिले. राज्य सरकाराच्या निर्णयानुसार, मला तृतीय वर्षात प्रवेश मिळायला हवा होता, पण विद्यापीठाकडून याबाबत आदेश आले नाहीत असे सांगून पुढच्या वर्षात प्रवेश दिला नाही,' असे नगरमधील एका महाविद्यालयाचा विद्यार्थी सांगत होता. तर हिच स्थिती वारजे येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थीनीची आहे.

'कोरोना'मुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा अर्धवट राहिल्या. लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षा होतील असे सांगण्यात आले. मात्र, 'कोरोना'तून लवकर सुटका नाही, हे समजल्याने परीक्षेबाबत काय करायचे हा प्रश्‍न संपूर्ण राज्यात निर्माण झाला. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करा, असे आदेश दिले. त्यानुसार पुणे विद्यापीठाने 'गणितीय पद्धती'नुसार सरासरी काढून निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू केली. जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या सुमारे ३ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत.

बॅकलॉग असले तरी पुढच्या वर्गात प्रवेश
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के अंतर्गत मूल्यांकन आणि ५० टक्के पूर्वीच्या गुणांवरून मूल्यांकन करून उत्तीर्ण केले जाईल. हा निर्णय बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांनाही लागू होईल असे स्पष्ट केले होते. मात्र, पुणे विद्यापीठाने निकाल लावाल्यानंतर पुढील वर्षाचे प्रवेश सुरू केल्यानंतर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

"माझे महाविद्यालय वारजे-माळवाडी येथे आहे. जे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्रामध्ये सर्व विषयात उत्तीर्ण होते, त्या सर्वांना तृतीय वर्षात प्रवेश मिळाला, पण माझ्यासह अनेकांचे दोन किंवा तीन पेक्षा जास्त विषय राहिले आहेत, अशांचा निकाल लावला नसल्याने तृतीय वर्षात प्रवेश मिळाला नाही. राज्य सरकारने काढलेल्या आदेशाची महाविद्यालय अंमलबजावणी करत नाही."
- एक विद्यार्थी, वारजे माळवाडी

"परीक्षा झाली असती, तर माझे दोन बॅकलॉगचे विषय मी काढले असते, पण परीक्षाच झालेली नसल्याने विषय राहिले आहेत. मला बी.कॉम.च्या तृतीय वर्षात प्रवेश मिळायला हवा होता, पण बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यासंदर्भात विद्यापीठाचे परिपत्रक मिळाले नाही असे सांगून महाविद्यालयाकडून अडवणूक सुरू झाली आहे. याबाबत विद्यापीठाने महाविद्यालयांना प्रवेश करून घेण्यबाबात स्पष्ट सूचना द्यावी.''
- एक विद्यार्थी, नगर

"राज्य सरकारने काढलेल्या १८ मे ज्या आदेशानुसार व पुणे विद्यापीठाने सर्क्‍युलर क्रमांक ९३,९४ नुसार अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या प्रवेशासंदर्भात महाविद्यालयांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तरीही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येत असतील, तर त्यांनी विद्यापाठाकडे संपर्क साधवा.''
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र- कुलगुरू, पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय संख्या - ९६८
कला, वाणिज्य, महाविद्यालये - ३४६
अभियांत्रिकी - १०९
इतर महाविद्यालये - ५१३
विद्यार्थी संख्या - ६.९२ लाख
बॅकलॉगचे प्रमाण - सुमारे ४० टक्के

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT