Ban on the sale of bottled water Pune University 
पुणे

पुणे विद्यापीठात बाटली नव्हे, ग्लासानेच प्यायचे पाणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एखाद्या कार्यक्रमात, चर्चासत्रात किंवा कॅंटीनमध्ये गेलात तर बाटलीबंद पाणी मिळते. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेत विद्यापीठाच्या आवारात बाटलीबंद पाण्याच्या वापरास व विक्रीला बंदी घातली आहे. यापुढे पाणी पिण्यासाठी ग्लासचाच वापर करावा लागणार असून, याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात प्लॅस्टिक बंदीचा कायदा आल्यानंतर विद्यापीठाने 1 जानेवारी 2019 रोजी परिपत्रक काढून विद्यापीठातील सर्व विभागांना प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये विद्यापीठात होणाऱ्या सभा, चर्चासत्र, परिषद, व्याख्यान यासह इतर कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटलीबंद पाण्याचा वापर करू नये, अशी सूचनाही देण्यात आली होती. हा आदेश निघाल्यानंतर काही दिवस याचे पालन झाले होते. मात्र, त्याचा विसर पडला.

देओल कुटुंबियाविरोधात पुण्यातील भाजप नेत्यावर आली न्यायालयात जाण्याची वेळ

त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील पाणी वापरास बंदी असल्याची आठवण करून देत त्याचे परिपत्रक काढले आहे. विद्यापीठातील विभागांनी कार्यक्रमांसाठी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन त्याची बिले सादर केल्यास वित्त व लेखा विभागाने ती मंजूर करू नयेत. तसेच उपाहारगृहांमध्ये पाण्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज

विद्यापीठाने यापूर्वीच पाण्याच्या बाटल्या विक्री करण्यास व कार्यक्रमांमध्ये वापर करण्यास मनाई केली होती; परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा याबाबत आदेश काढले आहेत. सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कॅंटीनमध्येही या पाण्याच्या बाटल्या विक्री करता येणार नाहीत.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT