Water-Tanker
Water-Tanker 
पुणे

बाणेर-बालेवाडीत पाणीटंचाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - उन्हाच्या कडाक्‍यानंतर नागरिकांना पाण्याच्या अनियमिततेनेही त्रस्त केले आहे. विशेषतः बाणेर, बालेवाडी आणि बाणेर-पाषाण लिंकरस्त्यावर तीव्र पाणी समस्या जाणवत आहे. मागील एक महिन्यापासून कमी दाबाने पाणी येणे, दोन - दोन दिवस पाणी न येणे, अशा समस्या शिवनेरी पार्क, सप्तगिरी सोसायटी, समर्थ कॉलनीसह इतर भागातील नागरिकांनी मांडल्या. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठ्यात कपात केल्याचे सांगत काही दिवसांत पुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे त्रस्त नागरिकांनी सांगितले.

बाणेर बालेवाडीत अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असल्याने खोदकाम केलेले आहे. कदाचित या खोदकामामुळेच पाण्याची समस्या जाणवत असेल असे नागरिकांना वाटत होते. परंतु आता काही ठिकाणची खोदकामे संपल्यानंतरही पाणीटंचाई ’जैसे थे’ आहे. यामुळे नागरीक पाणीटंचाईने हैराण आहेत. तक्रारी केल्यानंतर काही दिवस पाणी येते; परंतु नंतर लगेचच काही दिवसांत पूर्ववत परिस्थिती येते. यामुळे पाणी समस्येवर कायमचा उपाय शोधला जावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. सप्तगिरी सोसायटीत शुक्रवारी पाण्याचा दाब  कमी होता. परंतु, शनिवारी आणि रविवारी तर तेवढेही पाणी मिळाले नाही. तक्रारीनंतर टॅंकर पाठवण्यात आला आणि त्यानंतर थोडी समस्या कमी झाली. याविषयी पाणीपुरवठा विभागाकडे चौकशी केली असता, काही दिवसांतच सर्व ठिकाणचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. तसेच पाण्याचा प्रश्न केवळ बाणेर बालेवाडीतच नाही तर सर्वत्र आहे. त्यामुळे पाणी पुरेशा दाबाने येण्यासाठी प्रयत्न केले जातील.

एकंदरीतच स्मार्ट सिटीत नागरीक पाणी समस्येने त्रस्त झाले असून नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवले जावे, यासाठी पालिकेचे व अधिकाऱ्यांचे उंबरठे झीजवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT