Barti students get into trouble as training classes closed due to lockdown 
पुणे

कोरोनाचा प्रशिक्षणार्थ्यांना फटका : 'बार्टी' कडून प्रशिक्षण वर्ग बंद झाल्यामुळे विद्यार्थी अडचणीत

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन (बार्टी) संस्थेकडून सुरू करण्यात आलेले प्रशिक्षण वर्ग बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी राज्यसेवा परीक्षा -2020 साठी पुण्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये निःशुल्क आणि अनिवासी प्रशिक्षणासाठी जून 2019 मध्ये बार्टीद्वारे राज्यसेवा परीक्षेसाठी 50 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले. यानुसार 10 ऑगस्ट 2019 रोजी परीक्षा होऊन 1 सप्टेंबरपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र वेळापत्रकात बदल करत दोन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अंतिमतः 1 सप्टेंबर रोजी परीक्षा होऊन 18 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. निकालानंतर 10 दिवसांत गुणवत्ता यादी जाहीर करून प्रशिक्षण वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशिक्षण वर्गांना अद्याप सुरुवात झालेली नाही.

Coronavirus : आईला कोरोना; पण नवजात अर्भक ठणठणीत
राज्यसेवा पूर्वपरीक्षा-2020 पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 5 एप्रिलला होणार होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा 26 एप्रिल रोजी आयोजित करण्याचे निश्चित केले. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तत्पूर्वी बार्टीने प्रशिक्षण वर्गाविषयी उमेदवारांना अद्याप कोणतीही माहिती न दिल्याने उमेदवारांच्या मनात भविष्याशी खेळ सुरू असल्याची भावना निर्माण झाली आहे. 

Video : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत
स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण वर्ग घेण्याबाबत पूर्ण तयारी करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. सध्या सर्व प्रशिक्षण वर्ग बंद असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर प्रशिक्षण वर्ग तात्काळ सुरू करण्यात येतील.

Corona Virus : पुण्यात 4 तास बेवारस मृतदेह रस्त्यावर, कोरोनाची भीती? मागत होता 'ही' औषधे
-  कैलास कणसे, महासंचालक, बार्टी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांची मॉक ड्रिल आणि रूट मार्च...

IPL 2026 Update: कॅमेरून ग्रीनसाठी २५.२० कोटी मोजणारा KKR संघ विक्रीला; शाहरूख खान, जुही चावला यांचा आहे मालकी हक्क, पण...

नाटकप्रेमींनो लक्ष द्या! विजय केंकरे दिग्दर्शित "सुभेदार गेस्ट हाऊस" लवकरच रंगभूमीवर; कधी आहे शुभारंभाचा प्रयोग

SCROLL FOR NEXT