Beauty-Prlour
Beauty-Prlour 
पुणे

वाढत्या फॅशनमुळे ब्यूटिपार्लर तेजीत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सर्वत्र उद्योग, व्यवसायांत मंदीचे सावट असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचा फटका त्याला पूरक असलेल्या व्यवसायांनाही बसत आहे. मात्र, याउलट परिस्थिती ब्यूटिपार्लर व्यवसायात पाहायला मिळते. सध्याच्या काळात महिला आणि तरुणांमध्ये आपले सौंदर्य अधिक खुलविण्याचे क्रेझ आहे. स्वाभाविकच त्याचे पाऊल आपोआप ब्यूटिपार्लरच्या दिशेने वळतात. परिणामी, ब्यूटिपार्लर व्यवसायातील तेजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आपण खुलून दिसावे, असे प्रत्येकाला वाटत असते. अर्थात याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक असते. त्यामुळेच लग्न, सण समारंभांसह अन्य कार्यक्रमांसाठी पार्लरमध्ये जाण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरात अधिकाधिक फॅशनेबल पार्लरची संख्याही अधिक आहे. तसेच सोसायट्यांमध्येही घरगुती पार्लरची संख्या लक्षणीय आहे. 

गेल्या काही वर्षांपासून ब्यूटिपार्लर व्यवसायाचे स्वरूप बदलत आहे. तरुणाईची वाढती क्रेझ लक्षात तो फायदेशीर व्यवसाय म्हणून नावारूपाला येत आहे. ‘हौसेला मोल नसते’ या उक्तीप्रमाणे यातून मिळणारे उत्पन्नही वाढत आहे.

महिन्याला सुमारे ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळविणारे अनेक व्यावसायिक बाजारात आहेत. यात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व्यावसायिकांचा समावेश आहे. अनेक जण तर पार्लरचे शिक्षण विदेशात घेऊन येथे अत्याधुनिक पार्लरच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करतात. तसेच प्रशिक्षणही देतात. आकर्षक पार्लर आणि त्याची स्टायलिश जाहिरात हे त्यांच्याकडे आकर्षित करण्याचे मुख्य साधन समजले जाते. त्यातून तरुणाई अशा पार्लरमध्ये येते. त्यामुळे या व्यवसायात तेजीचे वातावरण असल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT