beneficial for state to fight upcoming elections together said sanjay Raut 
पुणे

आगामी निवडणुका महाआघाडीने एकत्रित लढणे राज्याच्या हिताचे, संजय राऊत यांचे सूतोवाच

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुंबईच नव्हे; तर आगामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड या महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र सरकार चालवत आहे. त्यांच्यात समन्वय चांगला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढविणे राज्याच्या हिताचे आहेत, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकत्रित लढविण्याचे सूतोवाच केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने राऊत यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे आणि संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे व्यासपीठावर उपस्थित होते. राऊत यांनी मराठा आरक्षण, उद्धव यांच्यावरील टीका, विरोधी पक्षांची भूमिका, राज्यपालांचा दुजाभाव यांनी स्पष्ट मते मांडली.

माणसावरील हल्ल्यानंतरच वनविभागाला जाग! बिबट्याला पकडण्यासाठी लावला पिंजरा

फडणवीसांना कोपरखळी
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, "नवीन सरकार पुढे आव्हाने निर्माण करण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. पण राज्यात किंवा केंद्रात आपले विरोधक असूच नये, त्यांना राजकारणात वा समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी वृत्ती वाढली आहे. हा राजकीय दहशतवाद देशाला घातक आहे. राज्यातील विरोधी पक्षाची सरकारविरोधी भूमिका लोकशाहीत बसत नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरील नेता होण्याची क्षमता आहे. आम्ही त्यांचा सन्मानच केला. पण त्याचे मुख्यमंत्रीपद गेल्याने ते धक्का पचवू शकले नाही. पण कुणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही.''

उर्मिला मातोंडकरबाबत मौन
उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेची शिवसेनाकडून उमेदवारीबाबत राऊत म्हणाले, "मीही चर्चा ऐकली आहे. परंतु परिषदेच्या बारा जागांवर मंत्रिमंडळात चर्चा होईल. तीन पक्ष त्या नावांवर निर्णय घेतलीे आणि मुख्यमंत्री ही नावे राज्यपालांकडे पाठवतील, त्यानंतर नावे समजतील.'' राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे प्रश्‍न घेऊन राज्यपालांना भेटणे, हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्या राज्यपाल भेटीबाबत केली.

'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर​

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. या विषयी राजकारण करून वातावरण तापवू नये. हा विषय केंद्राच्या अख्त्यारित आहे, त्यात पंतप्रधानांनी लक्ष घातले पाहिजे. साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजी राजे दोघे भाजपचे नेते आहेत. या दोन्ही राजांनी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात घेऊन जावा. त्यांच्या नेतृत्वाखाली हा विषय सुटला, तर कुणाला वाईट वाटणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT