शाळेतील मुलांसमवेत शिक्षक भाऊसाहेब चासकर. 
पुणे

मुलांच्या भावविश्वाचा आदर करणारे चासकर गुरुजी

नीला शर्मा

पुणे - शाळेत चक्क गप्पांचा तास? हो! हा अभिनव प्रयोग करण्याची कल्पकता भाऊसाहेब चासकर यांनी दाखवली. त्यातून विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीची चव कळली. आपापल्या अनुभवांबद्दल ते बोलू लागले. आणखी सजगपणे अनुभव घेण्याचा छंदच जणू त्यांना जडला. त्यातूनच शिकत जाण्याची वाट उलगडत गेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वीरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब चासकर चोवीस वर्षांपासून अध्यापन करत आहेत. त्यांनी मुलांच्या भावविश्वाचा आदर करून योजलेले अनेक यशस्वी प्रयोग कित्येक शिक्षक व पालकांना मार्गदर्शक ठरले आहेत. 

चासकर म्हणाले, ‘ग्रामीण व आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण जास्तीत जास्त आनंददायी व्हावं, म्हणून माइंड मॅपसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना राबविल्या. मुलांना काय कळतं, हा मोठ्या माणसांच्या मनातील गैरसमज हाच बालशिक्षणात अडसर होऊन बसतो. मुलांचं भावविश्व, अनुभवविश्व हेच त्यांच्या शिकण्याचं साधन बनलं पाहिजे. नुसता भाकरी हा शब्द एकदा गप्पांसाठी पुढे केला. त्यावरून भाकरी कोणकोणत्या धान्यांपासून, कशी करतात, तिचा आकार, ती करणाऱ्या आई-आजीशी असलेलं नातं, भूक, पाणी वगैरे केवढे तरी शब्द मुलं बोलत गेली. त्यांच्या मनातला भाषिक नकाशा अशा प्रकारे समोर येतो. एकाचं ऐकून दुसऱ्याला वेगळं काही जाणवतं. अभिव्यक्तीतून आत्मविश्वास वाढतो. परिसरातील संदर्भ घेऊन आपलं आपण खूप काही शिकतो, हे मुलांना उलगडतं. लादलेल्या, अनोळखी विषयांचा येणारा कंटाळा वाटणारं शिक्षण आशयघन होण्यासाठी हे प्रयत्न आहेत.’

चासकरांनी असंही सांगितलं की, हरिश्‍चंद्र गडावर प्लॅस्टिकचा कचरा गोळा करायला आम्ही गेलो. तो कचरा तर मुलांनी व्यवस्थित जमवून खाली आणलाच, पण तेथील विविध प्रकारच्या वनस्पतींचं निरीक्षण हा विषय त्यांना फारच आवडला. पर्यावरणाबाबत वरवरच्या निबंध किंवा भाषणापेक्षा यातून तो विषय जिव्हाळ्याचा झाला. शेतीसंबंधीचे पारिभाषिक शब्द मरणपंथाला लागले आहेत, हे लक्षात घेऊन त्यांची माहिती वडीलधाऱ्यांकडून जमवण्याचा प्रकल्प केला. त्यातून अडीच हजारांहून अधिक शब्द, म्हणी, गाणी, कोडी, उखाण्यांचं संकलन झालं. प्रमाण भाषेच्या दडपणाखाली गुदमरण्याऐवजी मुलं बोलत असलेली त्या - त्या घर व परिसरातील भाषा मला महत्त्वाची वाटते. मुलांच्या भाषेतील लावण्य व सखोलता दाखवणारे अनेक प्रयोग बऱ्याच ठिकाणी झाले आहेत. मी अशा समविचारी शिक्षकांच्या कामाचं महत्त्व संधी मिळेल, तेव्हा परोपरीने सांगतो.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT