Bhimsrushti
Bhimsrushti 
पुणे

भीमसृष्टीतील शिलालेखात चुकाच चुका

सकाळ वृत्तसेवा

भोसरी - महापालिकेने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उभारलेल्या भीमसृष्टीच्या शिलालेखात चुकीची माहिती देऊन अज्ञानपणाचे दर्शन घडविले आहे. येथे भेट देण्यासाठी येणारे विद्यार्थी, नागरिकांत चुकीची माहिती जाणार असल्याने म्युरल्सजवळ लावलेले माहितीपर शिलालेख बदलून खरा इतिहास सांगणारे शिलालेख लावण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे सचिव गिरीश वाघमारे यांनी केली आहे. शिलालेख तातडीने न बदलल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

महापालिकेने उभारलेल्या भीमसृष्टीचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन झाले. भीमसृष्टीत डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एकोणीस म्युरल्स बसविले आहेत. म्युरल्सजवळ प्रसंगांची माहिती सुवर्णाक्षरात कोरली आहे. मात्र, यापैकी तेरा म्युरल्समधील प्रसंगांची माहिती चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे. यात इतिहासकाळातील प्रसंग, घडामोडी, तारखा, सनावळी, संत-महापुरुष, विशेष व्यक्ती, संस्था यांचा उचित गौरव, पदवी-सन्मान, कालानुक्रमाने घटनाप्रसंग यांचा सुसंगतपणे अर्थ लागत नसल्याच्या गंभीर चुकांकडेही लक्ष वेधले आहे.

भीमसृष्टीत तिसरी गोलमेज परिषद ही १३ जून १९३३ ते १ सप्टेंबर १९३३ असा उल्लेख आला आहे. मात्र, तो नोव्हेंबर १९३२ ते डिसेंबर १९३२ असा असायला हवा होता. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना १९२४ मधील असताना ती १९२० मध्ये दर्शविण्यात आली आहे. २४ सप्टेंबर १९३२ च्या पुणे कराराचा उल्लेख माहितीपटात नाही. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेले इंग्रजी वृत्तपत्र पीपल्स हेराल्डचा उल्लेख टाळला आहे. इतरही अशुद्ध लेखनाच्या चुकांबरोबरच इतरही गंभीर चुका केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. चुकीची माहिती तातडीने बदलली गेली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘भीमसृष्टी प्रकल्पाचा अहवाल तपासणीसह नागरी हक्क सुरक्षा समितीने दर्शविलेल्या चुकांचा अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT