jejuri- ayodhya 
पुणे

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा 

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : अयोध्येत बुधवारी श्रीराम मंदिर बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबाचा बेल भंडार आज पाठविण्यात आला.

खंडोबाचे निस्सीम भक्त असलेल्या उमाजीराजे नाईक यांच्या रामोशी समाजातील कार्यकर्त्यांनी गडावरून हा भंडार आणला होता. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खंडोबा प्रतिमेचे पूजन केले. खंडोबा देवाच्या स्वयंभू लिंगावरील आणलेला बेलभंडार अयोध्येकडे रवाना करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसारक राजेंद्र चौधरी, किरण बारभाई, वैभव लांघी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराचे बील कोण देणार
 
या वेळी सन १९९२ मध्ये अयोध्येला गेलेले कारसेवक मनोहर भापकर, प्रकाश खाडे यांच्या हस्ते खंडोबाच्या व श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रभू रामचंद्रांचा जयजयकार केला. राजाभाऊ चौधरी यांनी पुणे येथे आचार्य भास्करगिरी महाराज यांच्याकडे भंडार अयोध्येला नेण्यासाठी सुपूर्द केला. या वेळी अविनाश मरकळे, पराशर मोरे, संतोष शिवले आदी उपस्थित होते.

दरम्यान, बुधवारी पहाटे खंडोबा गडामध्ये पूजा अभिषेक केला जाणार आहे. गावातील राम मंदिर, कडेपठारचे राम मंदिर, हनुमान मंदिर व सर्वच मंदिरांमध्ये कार्यकर्ते पूजा करून दिवे लावणार आहेत. जेजुरीत सर्वत्र २०० किलो साखर वाटून आनंद साजरा केला जाणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली. राम मंदिराच्या भूमीपूजनावेळी गडावर सनई चौघडा व नगारा वाजविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ

Gautala Sanctuary: गौताळा अभयारण्यात निसर्गाचा मनमोहक जल्लोष! सीताखोरी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Hadapsar Traffic: अवघ्या 500 मीटरसाठी 30 मिनिटे! महंमदवाडी–उंड्री रस्त्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT