Pune-Traffic 
पुणे

पुणेकरांनो, रविवारी बाहेर पडताय? मोर्चामुळे वाहतुकीत मोठा बदल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ रविवारी (ता. 29) शहरामध्ये गोळीबार मैदान ते कौन्सिल हॉलपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी अकरा वाजल्यापासून मोर्चा संपेपर्यंत संबंधित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. 

रविवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार मैदान येथे मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा सेव्हन लव्हज चौकातून नेहरू रस्त्याने सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, संत कबीर चौक, पॉवर हाऊस चौक, नरपतगीर चौक, मालधक्का चौक, ससून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, साधू वासवानी चौकामार्गे कौन्सिल हॉल येथे जाणार आहे.

''या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे वाहतुक सुरळीत व सुरक्षित सुरू राहण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा'', असे आवाहन वाहतुक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे व पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी केले आहे. 

बंद करण्यात आलेले मार्ग आणि कंसात पर्यायी मार्ग 

- गोळीबार मैदान चौक ते स्वारगेटकडील मार्ग (गोळीबार मैदान चौकातून डावीकडे वळून सीडीओ चौक गिरीधर भवन मार्गे पुढे) 

- सीडीओ चौक ते गोळीबार मैदान (खटाव बंगला चौक, नेपीयर रोड, मम्हादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक),

- सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान (सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला) 

- सोलापूर रस्त्यावरील मम्मादेवी चौक (मम्मादेवी चौक, बिशप स्कूल मार्गे कमांड हॉस्पिटल) 

- भैरोबानाला ते गोळीबार मैदान (प्रिन्स ऑफ वेल रोड किंवा भैरोबानाला वानवडी बाजार चौकमार्गे)

- कोंढव्याकडून गोळीबार मैदान (लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकमार्गे) 

- जेधे चौक (स्वारगेट) ते गोळीबार मैदान (जेधे चौक, मार्केट यार्ड चौक, वखार चौक ते गंगाधाम चौक) 

- मार्केट यार्ड ते मालधक्का चौक (डायस प्लॉट ते व्होल्गा चौक, सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक)

- शाहीर अमर शेख चौक (आरटीओ चौकातुन जहाँगीर रुग्णालय)

- येरवड्याकडून आयबी चौक (मंगलदास चौकातुन जहाँगीर चौक मार्गे इच्छितस्थळी)

- जहाँगीर हॉस्पीटल, आयबीकडे जाणारी वाहतूक (ब्ल्यू डायमंड चौकातून सर्कीट हाऊस चौकामार्गे पुढे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant : उद्धव ठाकरेंसोबत जाणार की नाही, उदय सामंतानी कोडं सोडवलं? कोकणातील महायुतीबाबत वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं संपवलं, ४०० वर्षापूर्वींचं AI LIVE रिपोर्टींग व्हायरल, शिवभक्त असाल तर नक्की पाहा

Latest Marathi Breaking News Live: मातोश्री परिसरात ड्रोनमुळे खळबळ!

Jalna News: आता नार्को चाचणी कराच; मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे पोलिसांना निवेदन

Uddhav Thackeray: शेती, संसार उद्‍ध्वस्त; पण मदतीची दमडीही नाही, ताडबोरगावात शेतकऱ्यांनी मांडली उद्धव ठाकरेंसमोर व्यथा

SCROLL FOR NEXT