saloon.jpg 
पुणे

सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर

सागर अव्हाड

पुणे : सलून व्यावसायिकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अनेक जण यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांना दाद द्यायला तयार नाही, त्यामुळे आता राज्यातील सलून व्यावसायिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

दरम्यान, तात्काळ अर्थिक मदत द्यावी व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात सलून व्यावसायिक रस्त्यावर येऊन  संसार थाटून  आंदोलन करतील. असा इशारा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.

तसेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात भंडारा शहरात अंगावर राॅकेल ओतून सलून व्यावसायिकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठ दिवसांत कवंटेमहाकाळ, चंद्रपुर, आता भंडारा यामध्ये एक आत्महत्या दोन आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. सरकार सलून व्यावसायिकांचा अजून किती अंत पाहणार व अजून किती बळी घेणार असा सवाल समाज विचारत आहे. सरकार ऐकून बहिरे आणि पाहून आंधळे असल्याचे सोंग का घेते आहे असे समाजातील नेते वाचारत आहेत. 

नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद याबाबत आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, ''गेली तीन महिने झाले सलून व्यावसायिक अर्थिक संकटात आहेत. सलून व्यावसायाला अजून परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे सलून व्यावसायिकांचे घर खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. त्यामध्ये तीन महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिलाचा बोजा वाढला आहे. यामुळे मानसिक व अर्थिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांनी आता टोकाची भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. 90% सलून दुकाने ही भाडेतत्वावर आहेत. लाॅकडाउन शिथील झाला असला तरी सलून व्यावसाय बंद आहेत. भाडे थकले असल्यामुळे दुकान मालकांनी दुकान बंद करून फर्नीचर काढायला भाग पाडले आहे. त्यामुळे सलून व्यावसायिक रस्त्यावर आले आहेत.''

ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने सलून दुकानदारास त्वरीत 1 लाख रुपये अर्थिक मदत देऊन सहा महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिल माफ करावे व सलून व्यावसायास सशर्त परवानगी द्यावी तसा आदेश राज्य सरकारने काढावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT