corona situation Sakal Media
पुणे

बारामतीतील कोरोना स्थितीबाबत मोठी बातमी

बारामती शहरातील कोरोनाची स्थिती घ्या जाणून

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहरातील कोरोनाची स्थिती झपाट्याने सुधारत असून आता बारामतीचे दैनंदिन जीवन पूर्ववत करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत असून हळुहळू स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याचे चित्र आहे.

बारामतीत गेल्या काही दिवसांपूर्वी परिस्थिती नाजूक बनली होती, आता मात्र त्यात वेगाने सुधारणा होऊ लागली आहे. बारामतीत ऑक्सिजनचे 299, व्हेंटीलेटरचे 9 व आयसीयुचे 27 बेडस रिकामे असल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दवाखान्यातील रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून बरे होणा-यांची संख्याही वाढू लागली आहे. बारामती तालुक्यातील 27 अलर्ट व हाय अलर्ट गावातील रुग्णसंख्या 996 वरुन 574 पर्यंत खाली असून बारामती नगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णसंख्या 1712 वरुन 720 पर्यंत खाली आहे. रुग्णसंख्या वेगाने खाली येत असल्याने प्रशासनालाही काहीसा दिलासा मिळाला आहे. पॉझिटीव्हीटी रेट हा वेगाने खाली येत असून आता वीस टक्क्यांपर्यंत तो खाली आल्याने परिस्थिती सुधारु लागली आहे.

दुसरीकडे लसीकरणावरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. बारामतीत आजपर्यंत 1 लाख 2200 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शासकीय धोरणांचा अवलंब करुन लसीकरण प्रक्रीया सुरु आहे. बारामती शहरात पाच तर तालुक्यात 31 ठिकाणी लसीकरण केंद्रामार्फत लस दिली जात आहे.

निर्बंध शिथील करण्याची मागणी- बारामतीची स्थिती वेगाने सुधारु लागल्याने आता बारामतीवर घातलेले निर्बंध 1 जूनपासून शिथील करुन अर्थचक्राला गती द्यायला हवी अशी मागणी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. 5 एप्रिलपासून बारामतीतील दुकाने बंद आहेत, जवळपास दोन महिने व्यवहार थंडावले असल्याने तातडीने बाजारपेठ सुरु करण्याची नितांत गरज असल्याचे महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी सांगितले.

• आजपर्यंतची रुग्णसंख्या- 23655

• बरे झालेले रुग्ण- 21287

• आजपर्यंत झालेले मृत्यू- 590

• बारामतीतील व्हेंटीलेटरवरील रुग्णसंख्या- 43

• बारामतीतील ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या- 515

• आठ कोविड केअर सेंटरमधील 580 रुग्णसंख्या.

• अँक्टिव्ह रुग्णसंख्या 1768

• रुई रुग्णालयातील रुग्णसंख्या 31

• सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील रुग्णसंख्या 117

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RR: राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल! मुबंई इंडियन्सने हरली अन् पंजाब - कोलकाताचंही स्वप्न तोडलं

Karnataka River Drowning Accident : नदीच्या प्रवाहात अचानक वाढ, शिंपले गोळा करण्यासाठी गेलेले ८ जण बुडाले; ७ महिलांचा समावेश

Jalna Water Crisis: अंबड तालुक्यातील मसई गावात पाण्यासाठी जीवघेणी कसरत; विजपंप बंद, ग्रामस्थांची उन्हात तहानलेली धावपळ

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR ला धक्का! १८ कोटींचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर; शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी बदली खेळाडूची घोषणा

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या खासदार डॉ. काकोली घोष दस्तीदार यांनी बारासात संसदीय जिल्ह्याच्या एआयटीसी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

SCROLL FOR NEXT