Accident
Accident 
पुणे

किडनी देऊन वाचवला होता आईचा जीव; अन् असा ओढावला त्याच्यावर मृत्यू!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्याची दुचाकी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या मालवाहू कंटेनरला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.१६) दुपारी चार वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळणावरील आंबेगाव खुर्द येथे घडली. काही दिवसांपूर्वीच संबंधीत विद्यार्थ्याने आपल्या आईला मुत्रपिंड देऊन तिला जीवदान दिले होते. 

प्रणव अतुल गलगले (वय 21, सध्या रा. किवळे फाटा, मूळ रा. विर्लेपार्ले, मुंबई) असे अपघातातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रणव हा शहरातील सिम्बायोसीसच्या अभियांत्रीकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होतो. प्रणव किवळे फाटा येथील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्वावर घेऊन राहात होता.

रविवारी दुपारी चार वाजता तो त्याच्या दुचाकीवरुन कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरुन त्याच्या घरी निघाला होता. त्याची दुचाकी चार आंबेगाव खुर्दजवळील डिमार्ट समोर आली. त्यावेळी प्रणवचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर रस्त्याच्याकडेला थांबलेल्या मालवाहू कंटेनरला त्याच्या दुचाकीची जोरात धडक बसली. त्यामध्ये त्याच्या डोक्‍याला व पोटाला गंभीर दुखापत झाली.

पोलिसांच्या मदतीने स्थानिक नागरीकांनी त्यास उपचारासाठी भारती हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर व प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन देशमुख तपास करीत आहेत. 

- मोठी बातमी : राज्यपाल बंदोबस्त आटोपून परततांना पोलिसांच्या गाडीला अपघात...

प्रणव कायम कार चालवित असे. मात्र रविवारी तो दुचाकी घेऊन गेला. त्याचवेळी त्याचा अपघात झाला. प्रणवच्या आईचे एक मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यामुळे प्रणवने आईला आपले मूत्रपिंड देऊन तिचा जीव वाचविला होता, असे त्याच्या मित्रांनी पोलिसांना माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT