Ration_Card 
पुणे

पिवळे-केशरी रेशनकार्डधारकांनो, महापालिकेने तुमच्यासाठी घेतलाय महत्त्वाचा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्याच्या विविध योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहे, अशा कोरोना बाधित रुग्णांनी महापालिकेने करार केलेल्या दहा खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्या बिलांची रक्कम महापालिका 'सीएचएस' दराने भरणार आहे. मात्र ज्या रुग्णांची स्वत:ची आर्थिक स्थिती चांगली आहे, ते या योजनांचे लाभार्थी होऊ शकणार नाही, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या फैलाव रोखण्यासोबतच रुग्णांवर उपचारांसाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेचे कोरोना उपचारांकरिता करार केलेल्या रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या रूग्णालयांमध्ये शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार उपचार केले जात आहेत. बाधित आणि संशयीत रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना या खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास एक लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा देण्यात येत. यासोबतच शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्‍टर असोशिएशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योजनांचाही लाभ दिला जात आहे. 

जे नागरीक या योजनांसाठी पात्र ठरत नाहीत, तसेच ज्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहेत अशा रुग्णांनी महापालिकेने करार केलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्या बिलांची रक्कम महापालिका "सीएचएस' दराने करणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. परंतु ज्या रुग्णांची स्वत:ची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि जे खर्च करु शकतात तसेच जे नागरिक या योजनांचे लाभार्थी होऊ शकत नाहीत त्यांची बिले मात्र महापालिका अदा करणार नाही. शासनाच्या 21 मेच्या अधिसुचनेनुसार सर्व खाजगी रुग्णालयांमार्फत कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे. 

रुग्णालयाचे नाव :
- सिंबॉयसीस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, लवळे 
- भारती हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे सातारा रोड, धनकवडी 
- सह्याद्री हॉस्पिटल कोथरुड 
- राव नर्सिंग होम, बिबवेवाडी 
- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर 
- श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबई- पुणे बायपास, नऱ्हे  
- इनलॅक्‍स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क 
- पुना हॉस्पिटल, सदाशिव पेठ, अलका टॉकीज शेजारी 
- ग्लोबल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, दत्तवाडी पोलीस चौकीजवळ 
- भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट प्रा.लि., कात्रज

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT