BJP Changes Candidate in Malegaon Corporation Election 
पुणे

पुणे : पोटनिवडणूकीत भाजपने उमेदवार बदलला; तर राष्ट्रवादीने...

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे (पुणे) : नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने घूमजाव करत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलला, तर भाजपने ऐनवेळी जाहीर केलेला अधिकृत उमेदवार बदलल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजला.

नगरसेवकपदासाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल. शनिवारी (ता. 21) छाननी होऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. शुक्रवारी (ता. 27) अर्जमाघारीसाठी मुदत असून, गुरुवारी (ता. 9) मतदान होईल. शुक्रवारी (ता. 10) मतमोजणी होईल. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडी पाहावयास मिळाल्या.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार थॉमस चंडी यांचे निधन

यापूर्वी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय करून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संगीता शेळके यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचा एबी फॉर्म अर्जासोबत जोडलेला नव्हता. यापूर्वी "राष्ट्रवादी'ने कॉंग्रेससोबत तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविलेली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने घूमजाव करत संगीता शेळके यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

धक्कादायक ! फडणवीस सरकारच्या एका वर्षात ६० हजार कोटींचा घोळ; कॅगचा ठपका

दुसरीकडे भाजपच्या वतीने चिराग खांडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, खांडगे उमेदवारी दाखल करण्यास आलेच नाहीत. अखेर कृष्णा म्हाळसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. बाहेरचा उमेदवार लादू नये, स्थानिक कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी असल्यामुळे उमेदवारी बदलल्याचे भाजपचे पदाधिकारी गिरीश खेर यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने उमेदवारी बदलाचा निर्णय घेतला, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT