PMC-Manjushree-Khardekar
PMC-Manjushree-Khardekar 
पुणे

Video : ग्रहणानंतर आंघोळ करता यावी म्हणून...; पुण्यात नगरसेविकेची अजब मागणी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण, ग्रहण म्हटलं की श्रद्धा-अंधश्रद्धा आल्याच. त्या पाळणं, न पाळणं ही वैयक्तिक गोष्ट. हिंदू धर्मात तर ग्रहणकाळात अमुक-अमुक गोष्ट वर्ज्य करावी, याची एक यादी बनेल.  पण ग्रहण आहे म्हणून एखादं शासकीय काम थांबवणं, हे स्वीकारणं थोडं जड जातं. असाच काहीसा प्रकार पुणे महानगरपालिकेत घडला.

हिंदू धर्मात ग्रहण काळ समाप्तीनंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल. हे टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने गुरुवारनंतर दुसऱ्या एखाद्या दिवशी देखभाल-दुरुस्तीचे काम करावे, आणि पाणीपुरवठा ग्रहण काळ संपेपर्यंत नेहमीप्रमाणे सुरू ठेवावा, अशी अजबगजब मागणी पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेने केली आहे.

येत्या गुरुवारी (ता.26) देशभरात सूर्यग्रहण दिसणार आहे. ते संपल्यानंतर नागरिकांना अंघोळ करावी लागते. त्यामुळे गुरुवारी होणारं पाईपलाईन दुरुस्तीचं काम पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केली. आपण ही मागणी नागरिकांच्या विनंतीवरून केल्याचे सांगायला त्या विसरल्या नाहीत.  

गेल्या काही महिन्यांपासून महिन्यातील प्रत्येक गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. या दिवशी पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीचे कामकाज केले जाते. मात्र, गुरुवारीच सूर्यग्रहण येत असल्याने हे काम पुढे ढकलावे. या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिला आणि दुसऱ्या दिवशी कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा झाला, तर शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होईल, अशी शक्यता खर्डेकर यांनी व्यक्त केली.

या मागणीचे निवेदन त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते धीरज घाटे यांना दिले आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.    

पुणे शहर हे 'विद्येचे माहेरघर' आहे. नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते आजही अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहेत. मात्र, नगरसेविकेसारख्या जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT