पुण्यातही होणार अटलजींचा भव्य पूर्णाकृती पुतळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

  • महापौर मुरलीधर मोहोळ यांची घोषणा
  • डॉ. शां. ब. मुजुमदार यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अटल संस्कृती पुरस्कार प्रदान

पुणे : पुणे महापालिकेने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे निश्चित केले आहे. येत्या वर्षभरात अटलबिहारी वाजपेयी यांचा महापालिकेच्या वतीने पुण्यात भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणाही आज (ता.२५) महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या समारंभात महापौर मोहोळ यांनी ही घोषणा केली. वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित गीत, संगीत, नृत्य असा दृकश्राव्य आविष्कार आयोजित करण्यात आला होता.

CAAवर मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

एम. एन. जी. एल.चे संचाकल राजेश पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संचालिका निकिता मोघे आदी व्यासपीठावर होते. आमदार चंद्रकांत पाटील तसेच आपले कोल्हापूर जिल्ह्याशी असलेले नाते उलगडून डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे दिल्या जाणार्याह पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार दिला जात असल्याबद्दल विशेष अभिमान असल्याचे सांगितले.

राहुल गांधींच्या सांगण्यावर UPSCचा नाद सोडला, आमदार झाली; मंत्रीपदाचीही शक्यता

25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, याच दिवशी वाजपेयी यांचा जन्म होणे हा दैवी योगायोग आहे. हा पुरस्कार कायम मनात जतन करून ठेवेन, असे ते म्हणाले. डॉ. कलाम आणि आता वाजपेयी यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप धन्यता वाटत आहे. अटलजींच्या हृदयात करुणा होती, मनात कविता होती आणि मेंदूमध्ये केवळ भारतमाता होती. सहमती आणि सहकार्य या दोन गोष्टींवर लोकशाही बळकट होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

पुणे : बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केले म्हणून पाहा मेव्हण्याने काय केले?

लखनौमध्ये वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले असल्याचे नमूद करून पुतळ्यांद्वारे आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा मिळते यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, अशी मागणी डॉ. मुजुमदार यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केली आणि क्षणाचाही विलंब न करता येत्या वर्षभरात वाजपेयी यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारू अशी ग्वाही महापौरांनी दिली.

अटलजींचा 25 फूट उंचीचा अष्टधातूंचा पुतळा; एवढा आला खर्च 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव करून आमदार पाटील म्हणाले, डॉ. मुजुमदार यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हा माझा सन्मान आहे. मुजुमदार यांनी छोट्या गावातून येऊनही शिक्षणाचे महत्त्व जाणले. त्यामुळे अनेकांना शिक्षणाची संधी मिळाली. पुण्याच्या विकासासाठी कायम सहकार्याची भावना असल्याचे सांगून लखनऊ येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्यापेक्षा पुण्यातील उभारला जाणारा वाजपेयी यांचा पुतळा मोठा असावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीस महापौर मोहोळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात नियमितपणे राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

गीत नया गाता हू
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त गीत नया मै गाता हॅूं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाते. याची संकल्पना आणि निर्मिती सुनील महाजन यांची होती. संहिता लेखन डॉ. माधवी वैद्य यांचे तर नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे होते. कार्यक्रमात अंजली मराठे, संदीप उबाळे यांनी गीते, चित्रपट अभिनेत्री तेजा देवकर यांनी नृत्य सादर केले.  केदार परांजपे, मिहिर भडकमकर, विशाल गंद्रटवार, ऋतुराज कोरे, अनय गाडगीळ यांनी साथसंगत केली. दृक-श्राव्य मांडणी प्रसाद कुलकर्णी यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते योगेश देशपांडे आणि अभिनेत्री पूजा पवार-साळुंके यांचे होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will be a grand statue of Atalji in Pune says Mayer Murlidhar Mohol