bjp leader chandrakant patil distributes sarees in kothrud pune by corporator
bjp leader chandrakant patil distributes sarees in kothrud pune by corporator 
पुणे

विरोध डावलून चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये साड्या वाटल्याच (व्हिडिओ)

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून  सड्या वाटण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपक्रमावर सर्वच स्तरातून प्रचंड टीका होऊनही पाटील समर्थक नगरसेवकांनी आज साड्या वाटल्या. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाटलांची इच्छा पूरण केली.  

कोथरूडमधून पाटील नुकतेच विजयी झाले आहेत. त्यांनतर मतदारसंघातील सुमारे दहा हजार महिलांना साड्या देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. मात्र, त्यांवरून वाद निर्माण झाला ,अशा प्रकारे साड्या वाटाण्याला  मनसेने  विरोध केला. मनसेचे पराभूत उमेदवार किशोर शिंदे आणि विभाग सुधीर धावडे यांनी तीव्र विरोध केला. पाठोपाठ आपनेही सुनावले. मात्र, बालवकडर यांनी प्रभागातील माहिलांना साड्या दिल्या. त्यावर पाटील यांचे छायाचित्र आहे. 

चंद्रकांत पाटील यांना साड्या वाटू देणार नाही : मनसेचा इशारा

आचारसंहिता नियमातून पळवाट काढण्याचा प्रकार : मनसे
या बाबत मनसेचे प्रमुख कार्यकर्ते अनिल शिदोरे ट्विटरद्वारे म्हणाले की 'पाटील यांना आमदारांचे काम काय आहे, हेच माहिती नाही. त्या मुळे ते असे उद्योग करत आहेत. 
मनसेचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, ''चंद्रकांत पाटील यांचा साडी वाटप कार्यक्रम  हे निवडणुकीमधील आमिषच असून, निवडणुकीदरम्यान भेटवस्तू वाटपच्या ऐवजी निवडणूकीनंतर भेटवस्तू वाटप करून आचारसंहिता नियमातून पळवाट काढण्याचा प्रकार आहे.'' भेटवस्तू वाटप हे मतदानाशी संबंधितच असल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी आम्ही  करीत आहोत. निवडणुकीनंतर वैयक्तिक प्रलोभनांची पूर्तता करण्याचा नवा पायंडा भाजपचे नेते पाडत आहेत. नैतिकतेची टिमकी वाजवणाऱ्या भाजपा हा नवा निर्लज्य अवतार आहे. स्थानिक वस्ती पातळीवर भाजपचे नगरसेवक हे प्रलोभन पूर्तीचे एजंट असल्याने हे काम तेच करणार आहेत, असेही किर्दत यांनी म्हटले आहे.

पुण्यातील सर्व महिलांना भाऊबीज द्यावी
चंद्रकांत पुण्याचे पालकमंत्री असल्याने त्यांना महिलांना भाऊबीज घ्यायचीच असेल तर, सर्व पुणेकर महिलांना द्यावी म्हणजे आपोआप त्यांचे प्रेम लाखो त्रस्त महिलांना कळेल आणि पुढे या मुली बहिणींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना खरोखर काय हवे आहे हे पण समजावून घ्यावे, असेही किर्दत यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT