BJP MLA Jayakumar Gore is also a fan of Ajit Pawar  sakal
पुणे

भाजपचे आमदार जयकुमार गोरेही अजितदादांचे 'फॅन'

नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात का याची चर्चा सुरु

मिलिद संगई

बारामती : आमची राजकीय भूमिका काहीही असो पण मी अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा फॅन आहे....त्यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे हे जाहिरपणे सांगायला मला संकोच वाटत नाही, अशा शब्दात भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Bhagwanrao Gore) यांनी आज बारामतीत अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली.

विशेष म्हणजे अजित पवारांच्या अनुपस्थितीत आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर अगदी सहजतेने जयकुमार गोरे यांनी मोकळेपणाने ही कबूली दिल्याने आता नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात का याची चर्चा सुरु झाली आहे. येथील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उदघाटन अजित पवार यांनी केले. मात्र वेळेपूर्वी तासभर येत उदघाटन उरकून अजित पवार निघून गेले होते.

जयकुमार गोरे व दत्तात्रय भरणे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. जयकुमार गोरे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली, राजकीय मते वेगळी असली तरी मी अजितदादांचा फॅन असल्याची कबूली देत मला हे जाहिरपणे कबूल करण्यास फार काही वाटत नाही अशीही पुस्ती त्यांनी जोडली. दादांकडे निर्णय घेण्याची धडाडी व धाडस आहे,ते स्पष्टवक्ते आहेत, त्या मुळे राजकारणापलिकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे असे गोरे म्हणाले.

हाच धागा पकडत दत्तात्रय भरणे यांनी त्यांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाचीच ऑफर देऊन टाकली. थेट ऑफर दिलेली नसली तरी तुमचा विचार असेल तर आम्हीही त्याला प्रतिसाद देऊ असे ते म्हणाले. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणा-या काळात वेगळा विचार करा त्यांला चांगला विचार असे भरणे यांनी शब्द वापरले. बारामतीत झालेल्या या राजकीय धुरळ्याने आता पुन्हा काही राजकीय समीकरणे बदलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT