Blood_Storage 
पुणे

पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या अडचणी काही कमी होईनात; रक्तसाठा पडतोय कमी!

अक्षता पवार

पुणे : माझे वडील 'डायलेसिस'चे रूग्ण आहेत आणि ते ५२ वर्षाचे असून गल्या तीन चार दिवसांपासून सह्याद्री रूग्णालयात ऍडमिट होते. तर बुधवारी रूग्णालयातून सांगण्यात आले की, त्यांचे 'हिमोग्लोबिन' कमी झाले असून त्यांना तातडीने रक्त चढवण्याची गरज आहे. यासाठी अम्हाला 'एबी' निगेटिव्ह या रक्ताची गरज होती.

पुण्यातील सर्व रुग्णालय आणि ब्लड बॅंकमध्ये चौकशी केली मात्र या प्रकारचा रक्तसाठा कुठेही उपलब्ध नव्हता. खूप प्रयत्न केल्यानंतर एक रक्ताच्या पाकेटाची जुळणी शक्‍य झाली, पण त्याची 'एक्‍सपायरी डेट' तीन दिवसांनी संपणार होती. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्या रक्ताचा वापर केला नाही. त्यात नागरिकसुद्धा रक्तदानाला बाहेर पडण्यास घाबरत असल्याने मात्र या रक्त गटाचा शोध कसा लावू याच चिंतेत होतो, तेव्हा 'ब्लड फॉर पुणे' बाबत समजले. या अभियानामुळे आज माझ्या बाबांना वेळेत रक्त मिळाले.' अशी माहिती २५ वर्षीय आकाश खामकर या तरूणाने 'सकाळ'शी बोलताना दिली. 

आकाशचे वडील अजित खामकर हे गेल्या चार वर्षांपासून डायलिसिस करत आहेत. त्यांना यापूर्वी रक्तासाठी कोणतीही अडचण उद्भवली नाही. दरम्यान सध्या कोरोनामुळे रक्तदान शिबिरांची संख्या पूर्ण कमी झाली असून पुण्यातील रक्तपेढ्या आणि रुग्णालयांमध्ये रक्तसाठा कमी झाला असून खामकर कुटुंबीयांना याचा अनुभव मिळाला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून समाजमाध्यमांद्वारे पुण्यात रुग्णांसाठी रक्ताची मागणी केली जात आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी निगेटिव्ह रक्त गटाची मागणी सर्वाधिक असल्याचे दिसून आले. 

याबाबत माहिती देताना 'लव्ह केअर शेअर फाऊंडेशन'चे संस्थापक संचालक पीयूष शाह म्हणाले, "यंदा कोरोनामुळे रक्तशिबिरांची संख्या कमी झाल्याने शहरातील मोठमोठ्या रूग्णालयांमध्ये रक्ताची मागणी वाढली आहे. त्यामुळे फाऊंडेशन तर्फे 'ब्लड फॉर पुणे' मोहिम राबविण्यात येत असून समाजमाध्यमातून लोकांना रक्तदान करण्याची मागणी करत आहोत.'' 

कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक रक्तदान करण्यास घराबाहेर पडायला घाबरत आहेत. त्यामुळे रक्त संकलन कमी झाले असून फक्त रुग्णालयातच नाही, तर विविध बल्ड बॅंकमध्ये रक्ताचा तुटवडा होत आहे. तसेच एकूण रक्तदान प्रक्रिया कमी झाल्याने निगेटिव्ह रक्त गट असलेल्या लोकांना शोधणे म्हणजेच तारेवरची कसरत झाली आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज असून सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करावे. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनीसुद्धा प्लाझ्मा दान करावा. सध्या शहरातील सर्व रक्तपेढ्यांतर्फे लोकांना याबाबात आवाहन केले जात आहे. 
- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी 

रक्त संकलन कमी झाल्याची कारणे 
- नागरिकांमध्ये रक्तदान केल्यास कोरोना होण्याची भीती 
- लॉकडाऊनमुळे विविध रक्तदान शिबिरांचे आयोजन रद्द 
- त्यामुळे दुर्मिळ रक्त गट असलेल्या रक्ताचा साठा कमी 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT