hsc and ssc october 2020 exam  
पुणे

दहावी, बारावीत नापास झाल्यास पुन्हा परीक्षा होणार की नाही?

मिनाक्षी गुरव

पुणे, - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती खुद्द राज्य मंडळाकडे नाही. परिणामी यंदा दहावी-बारावीसाठी फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. 

दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,  विनोद तावडे शिक्षणमंत्री असतांना, त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणारी फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुलै २०१५ पासून फेरपरीक्षा घेण्यात येते. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल तब्बल दीड महिने उशिरा जाहीर झाला आहे. तर, दहावीचा निकाल जुलै अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, ऑगस्ट महिन्यातही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. त्यामुळे निकालानंतर लगेचच ऑगस्टमध्ये ही परीक्षा घेणे शक्य नाही. यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात देखील या परीक्षांबाबत उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुन्हा ऑक्टोबरला परीक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा उच्च शिक्षणातील शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने त्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार नाही. त्यामुळे यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.

याबाबत, मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी एकीकडे ऑनलाईन शाळा सूरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे विद्यापीठ स्तरावर परीक्षांबाबत अद्याप चर्चा सुरु आहेत, त्यामुळे दहावी- बारावीच्या फेरपरीक्षांबाबत काहीच सांगता येणार नाही, असे सांगितले आहे.

आता प्रतीक्षा दहावीच्या निकालाची

राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात दहावीचा निकाल जाहीर होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडले होते. त्यामुळे निकाल लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करत आहोत, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

Devendra Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिले संकेत; म्हणाले...

SCROLL FOR NEXT