dead_body 
पुणे

साठ फूट खोल विहिरीत दिसले धक्कादायक दृश्य

अर्जुन शिंदे

आळेफाटा (पुणे) : जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे आज (ता. ३१) सकाळी जुन्नर बाजार समितीच्या हद्दीतील बेल्हे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात एक विवाहित माहिला व एका लहान मुलीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या दोघीही मायलेकी असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, बेल्हे येथे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचे हद्दीत बेल्हे ग्रामपंचायतीच्या मालकीची सुमारे ६० फुट खोल विहीर आहे. या विहिरीतील पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचे एका स्थानिक ग्रामस्थास दिसून आले. त्याने ही माहिती तत्काळ गावकामगार पोलिस पाटील बाळकृष्ण शिरतर यांच्या माध्यमातून आळेफाटा पोलिस ठाण्यास कळविली. 

आळेफाटा पोलिस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस कर्मचारी, सहायक फौजदार एस. एम. भवारी, पोलिस नाईक संदिप फड, नरेंद्र गोराणे, एम. एस. पठारे, मोहन आनंदगावकर, चालक रहाणे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. संबंधित मृतदेह शितल संतोष भालेराव (वय ४०) व आर्या संतोष भालेराव (वय ५, रा. बेल्हे) या मायलेकींचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतचा पुढील तपास आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT