dead_body
dead_body 
पुणे

झुडपातील चादरीत आढळला नग्न अवस्थेतील मृतदेह

महेंद्र शिंदे

खेड शिवापूर (पुणे) : हवेली तालुक्यातील मोरदरी येथे रविवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली की, कोंढणपूर ते कल्याण या रस्त्यावर मोरदरी गावाच्या हद्दीतील एका शेतातील करवंदाच्या झुडपात चादरीत गुंडाळलेला एक मृतदेह रविवारी रात्री ग्रामस्थांना आढळून आला. ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार राजगड पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून तो मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

हा मृतदेह नग्न अवस्थेत चादरीत गुंडाळलेला होता. त्या मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे आहे. अंगाने सडपातळ, उंची पाच फूट सहा इंच, डोक्यावर काळे-पांढरे केस, दाढी वाढलेली असे या मृत व्यक्तीचे वर्णन आहे. तर, त्याच्या उजव्या डोळ्याच्या बुबळावर जखम झालेली आहे.

याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी सांगितले की, या व्यक्तीचा अज्ञात कोणीतरी खून करून हा मृतदेह मोरदरी येथे टाकून दिला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT