Babasaheb-Ambedkar 
पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला विधायक स्वरुप; स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या स्पर्धा परीक्षांची हजारो विद्यार्थी तयारी करीत आहेत.अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने 'वंदे मातरम्' संघटनेच्यावतीने अभ्यासासाठी उपयुक्त १० पुस्तकांचा मोफत संच देऊन आंबेडकर जयंतीला विधायक स्वरूप दिले जाणार आहे.

वंदे मातरम् संघटनेच्यावतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. जयंतीचा कार्यक्रम साजरा करताना त्यास विधायक स्वरूप दिले जाते. यावर्षी शहरावर कोरोनाचे सावट असल्याने संघटनेकडून सार्वजनिक जयंती साजरी करण्यात येणार नाही, मात्र विधायक उपक्रम यावर्षीही सुरू राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर वंदेमातरम् संघटना, अर्हम फाउंडेशन व सरहद या संस्थांच्या माध्यमातून युपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा संच ते असतील, त्या ठिकाणी जाऊन दिला जाणार आहे. हा उपक्रम १४ व १५ एप्रिलला सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत राबविला जाणार आहे. अशी माहिती वंदे मातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे यांनी दिली.

सामाजिक अंतर ठेवूनच राबविला जाणार उपक्रम

पुस्तक वाटप करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने सामाजिक अंतर ठेवून, पुरेपूर काळजी घेऊन आणि संचारबंदी आदेशाचे पालन करून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

होम क्वारंटाइन व्यक्तींनाही मिळू शकतील पुस्तके !

कोरोनामुळे काही व्यक्तींना आरोग्य विभागाने होम क्वारंटाइन केलेले आहे. अशा व्यक्ती घरी कंटाळल्या असतील, तर अशा व्यक्तींना तेथील आरोग्य सेवकांमार्फत किंवा गणपती मंडळामार्फत पुस्तके देण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे सचिन जामगे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२१६९३१७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT