Both NDA exams will be held in September 
पुणे

एनडीएच्या दोन्ही परीक्षा होणार सप्टेंबरमध्ये

सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व नेव्हल अकादमी (एनए)मध्ये प्रवेश घेण्यासाठीची परीक्षा येत्या 6 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सामान्यत: या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येते. परंतु कोरोनामुळे एनडीएची पहिली परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता एनडीएच्या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहेत.

मोठी बातमी : 'या' पाच प्रभागांतील निम्म्या पुणेकरांना कोरोनाची लागण; सर्व्हेतून पुढे आली माहिती!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने ही परीक्षा घेण्यात येते. एनडीएच्या दोन्ही परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र नुकतेच यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा एनडीएच्या 145 व्या आणि 146 व्या कोर्ससाठी तर नेव्हल अकादमीच्या 107 व्या आणि 108 व्या कोर्स साठी घेतली जाणार आहे. 

गणेशोत्सवात 'या' चार दिवशी ध्वनीवर्धक रात्री बारापर्यंत सुरू राहणार; पुणे पोलिसांनी केले जाहीर!​

दरम्यान, ज्या उमेदवारांनी एनडीएच्या 145 व्या आणि नेव्हल अकादमीच्या 107 व्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरला होता आणि त्यांचे प्रवेशपत्र आले नाही त्यांनी सैन्यदलाच्या 'तांत्रिक प्रवेश योजने'साठी (टीईएस) अर्ज भरावा अशी सूचना सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. टीईएस प्रवेश प्रक्रिया 12 वी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी असून सध्या काही कारणांमुळे ज्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आले नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज भरावा असे त्यात सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking: जर्मनीचा खेळ खल्लास... पॅराग्वेचा पेनल्टी शूट आऊटमध्ये रोमहर्षक विजय, Fifa World Cup स्पर्धेतून माजी विजेते बाहेर

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

SCROLL FOR NEXT