manchar1.jpg
manchar1.jpg 
पुणे

पुणे जिल्ह्यातील तब्बल `एवढ्या` गावांच्या सीमा सील

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेले २५ रुग्ण आढळून आल्यामुळे १२ गावांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक (कन्टेन्मेंट) झोन जाहीर झाल्यामुळे सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्याबरोबरच पोलीस, कामगार तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांचा गावात व सीमेवर जागता पाहरा सुरु झाला आहे.

अचानक रात्री उशिरा खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सीमेवर असलेल्या बंदोबस्ताची पाहणी करत असल्यामुळे पहारा देणाऱ्यांची यंत्रणा अलर्ट झाली आहे.
 साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, गांजवेवाडी (वळती), वडगाव काशिंबेग, पिंगळवाडी (लांडेवाडी) फदालेवाडी, पेठ, घोडेगाव, एकलहरे, गिरवली आदी गावात तब्बल २५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी शिनोली येथील एक रुग्ण बरा होऊन गुरुवारी (ता. २८) घरी आला आहे. उर्वरित २४ जणांवर उपचार सुरु आहेत.

सर्वाधिक रुग्ण वडगाव काशिंबेग येथे एकूण ८ जण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाच कुटुंबातील ७ जण व दुसऱ्या कुटुंबातील एकजण आहे. मुंबईहून आलेल्या एकाला जुन्नर शहरात थांबण्यास नगर परिषदेने मनाई केली होती. सदर व्यक्तीला एकलहरे येथे त्यांच्या पाहुण्याने आश्रय दिला. त्यामुळे एकलहरे गावही कोरोनाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे सदर रुग्ण मंचर उपजिल्हा रुग्णालयामार्फत स्वत:हून पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. रुग्णाच्या संपर्कातील लोकांवर भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.

पूर्वी संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी पुण्याला नायडू हॉस्पिटल, औंध हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, पिंपरी चिंचवडचे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये पाठविले जात होते. पण रुग्णांची गैरसोय होऊ नये. प्रवासातील वेळ वाचवा म्हणून राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला आदेश दिले. त्यामुळे संशयित सर्व रुग्णांचे नमुने मंचर उपजिल्हा रुग्णालयामार्फत भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये शुक्रवार (ता २२) पासून घेतले जात आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णावर भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्येच उपचार केले जातात. या हॉस्पिटलमध्ये पुण्याप्रमाणेच सर्व वैद्यकीय सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाकडून दररोज रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली जाते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दरम्यान, मुंबईहून आलेल्या व होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी गावातील खबरे कार्यरत केले आहेत. सीमा बंद करून सुरु असलेल्या कडक अंबलबजावणीची पाहणी शुक्रवारी (ता. 29) रात्री ११ वाजता अचानकपणे खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी पेठ व एकलहरे येथे केली. ग्रामस्थांशी सवांद साधून आलेले महाभयंकर संकट परतून जाण्यासाठी पोलीस खात्याला व प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आव्हान टोम्पे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT