A Boy dies after falling from Tikona fort in Pune 
पुणे

हेडफोनच्या नादात त्याचा तोल गेला अन् तिकोनाच्या कड्यावरुन...

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला(पुणे) : तिकोना किल्ल्यावरून दक्षिणेच्या बाजूला एका युवकाचा हेडफोन सांभळ्याण्याच्या नादात पाय घसरून तोल गेला आणि कड्यावरुन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी अडीच ते पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. याठिकाणी अद्याप मदत कार्य पोहोचलेले नाही. तसेच आणखी 5 मुले कड्यावर अडकली असूून त्यांची सुटका करण्यासाठी मदतकार्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Video : पहाटेचा 'लिंबूडाव' झाला कॅमेऱ्यात कैद, काय ते पाहा... 

हार्दिक माळी (वय अंदाजे २५ वर्ष,  रा. तळेगांव दाभाडे) असे या मृत मुलाचे नाव असून हा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. हा युवक आपल्या मित्रांसमवेत मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर भटकंतीसाठी गेला होता. भटकंती सुरू असताना पाय घसरून तो खाली पडला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्ग भ्रमंतीकार मारुती गोळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

याबाबत, मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी मदत कार्य पाठविले आहे. शिवदुर्ग संघटनेच्या कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Video : आई तू पण; तरीही मी जगणारचं....

बुरजावरुन पडलेल्या हार्दिकला पाहण्यासाठी खालून वर गेलेले आणखी 5 जण युवक अडकले होते. त्यापैकी 3 जणांची सुटका झाली असून आणखी दोघे अडकले आहेत. त्या दोघांची सुटका केल्यानंतर हार्दिकचा मृतदेह काढणार आहेत.
पुण्यात रिक्षांच्या डिक्कीचोराचा धुमाकुळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT