Crime 
पुणे

धक्कादायक : रागाच्या भरात त्याने केला मित्राचा खून अन् जाळला मृतदेह!

सकाळ वृत्तसेवा

धायरी : सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे बुधवारी (ता.११) सकाळी वडगाव येथील सिंहगड कॉलेजजवळ एका इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. सदर घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल दाखल झाले.

पाहणी करताना सदर मृत व्यक्तीच्या डोक्यामध्ये वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. एवढे करून तो हत्यारा थांबला नाही, तर त्याने सदर इसमाची ओळख पटू नये, याकरिता त्याचा मृतदेह जाळला. घटनेचे गांभीर्य पाहून मृत व्यक्ती आणि आरोपीची माहिती मिळवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाच्या तीनशे मीटर परिसरात तपासणी करण्यात आली. या तपासाअंती मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. बंडू निरंजन इंगळे (वय 40, रा. झोडगा, ता. बाशी टाकळी, जि. अकोला) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या मृत व्यक्तीचे मंगळवारी (ता.१०) रात्री एका इसमाबरोबर भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ज्या व्यक्तीशी मृत बंडू इंगळेचे भांडण झाले त्याचे नाव वीरेंद्रकुमार राममिलन सिंग (वय 20, रा. पितावली, पो. भरावंत, ठाणे - अतरोली, ता. संदेला, जि. हरडोई, उत्तर प्रदेश) असे असून त्याला तीन तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

अधिक तपासामध्ये, वीरेंद्रकुमार आणि मयत बंडू हे एकमेकांचे मित्र होते. आणि रात्री दारूच्या नशेत असताना त्यांची भांडणे झाली. राग अनावर झाल्याने वीरेंद्रकुमारने बंडूच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT