पुणे

तेरा वर्षांचा मुलगा म्हणतोय, 'काय केलं होतं गं माझ्या पब्जीनं,' व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

सागर आव्हाड

पुणे : आधी टीकटाॅक व आता पब्जीवर सरकारने बंदी घातली आहे. मात्र पब्जी खेळणारे आता वैतागले आहेत. पब्जीसारखे गेम लहान मुलांवर वाईट परिणाम करतात, अनेक वेळा पालकांनी व शाळांनी या गेमवर बंदी घालावी अशा अनेक याचिका कोर्टात दाखल केलेल्या होत्या. अशा गेमपासून आपल्या पाल्यांना दूर ठेवणे ही पालकांचीच जबाबदारी होती, मात्र पालक लक्ष देऊनही मुलं ऐकत नव्हती. या पब्जीमुळे अनेक मुले वेडी झाली आहेत, तर अनेकांचे जीव देखील गेले आहेत. अनेकांनी या गेमच्या नादात खून ही केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

'पब्जी गेम' (प्लेयर अननोन बॅटलग्राऊंड्स) हा हिंसेची भावना वाढवणारा असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी मागणी पालक करत होते अखेर सरकारने बंदी घातली. मात्र बंदी घातल्यानंतर याचे चांगले-वाईट परिमाण आता दिसू लागले आहेत.

अनेक मुलं पालकांना त्रास देत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक 13 वर्षीय मुलगा पब्जी बंद झाली म्हणूण रडत आहे. काय केलंत गं त्या पब्जीनं उगाच बॅन केली. त्याची आई मध्येच त्याला ओरडते. अरे अभ्यास सोडून त्या पब्जीचं काय घेऊन बसलाय. दिवसभर गेम खेळत असतोस. त्यावर मुलगा म्हणतो, मम्मी तु गप्प बस इथं काय परिस्थिती आहे तुला माहिती आहे का? त्याच्या बहिणीकडे हात करत मुलगा म्हणते हिचे इन्स्टा कर की बंद, हीला कशाला हवेय इन्स्टाग्राम. हा सगळा संवाद मुलगा रडत असतानाचा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अशा अनेक केसेस आता हळूहळू समोर येतील, त्यामुळे अशा गेमपासून आपल्या मुलांना आपण लांब ठेवलं पाहिजे. पब्जी बंदीनंतर अनेक पालकांनी निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण अशा स्थितीत आपल्या पाल्यांनाही योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना या गेम कश्या घातक आहेत हे पटवून देणे आवश्यक आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! डॉक्टरला मागितली ५० लाखांची खंडणी,अत्‍याचाराच्‍या तक्रारीने म्हसवडला खंडणीचा कट, सातारा जिल्ह्यात खळबळ

Family Planning : कुटुंब नियोजनात ‘छाया’, ‘अंतरा’ गोळ्यांचा वापर; पुरुष नसबंदीला प्रतिसाद अत्यल्प

सोलापूरला दररोज पाणीपुरवठा! नव्याने टाकली जाणार ७१५ किमी पाइपलाइन; १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ; ८९२ कोटींपैकी २०० कोटी रोख्यातून उभारले जाणार

Morning Breakfast Recipe: हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात मुलांसाठी बनवा 'हे' 2 इन्स्टंट पदार्थ, लगेच नोट करा रेसिपी

संचमान्यतेपूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी! मधूनच शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांची होणार पडताळणी; इयत्ता अकरावी-बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

SCROLL FOR NEXT