A boy Save cat who fall in Thirty feet deep well in pune 
पुणे

Video : 'तिच्या'साठी 'त्याने' जीव पणाला लावला अन्‌ तीस फूट खोल विहिरीत उतरला

सकाळवृत्तसेवा

पुणे : महामारीच्या या काळात माणूस माणसाच्या मदतीला येत नसल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहिली. परंतु अशा परिस्थितीत विहीर पडलेले एक मांजर काढण्यासाठी कोणी जीवपणाला लावेल का, असा जर प्रश्‍न विचारला, तर त्याचे उत्तर नाही असेच मिळेल. परंतु मंगळवारी सकाळी कसबा पेठेतील मुजुमदार वाड्यात तीस फूट खोल विहिरीत अडकून पडलेले मांजर एका तरुणाने काढून तिला जीवदान दिले. 



पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कसबा पेठेत हा ऐतिहासिक वाडा आहे. या वाड्यातील विहिरीमध्ये एक मांजर आज सकाळी पडले. वाड्याच्या मालकीण अनुपमा मुजुमदार यांच्या ते लक्षात आले. नगरसेवक योगेश समेळ आणि अग्निशामक दलाशी त्यांनी संपर्क साधण्यात आला. दलाचे जवानही तत्काळ मदतीला धावून आले. त्याचवेळी तेथून जवळ असणाऱ्या भोई आळीतील अक्षय शेलार तेथे आला. विहीर पन्नास फुटांहून अधिक खोल आहे. अंधार असल्यामुळे मांजर दिसत नव्हती. फक्त तिच्या ओरडण्याचा आवाज येत होता.


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेलार ट्रेकर्स असल्यामुळे त्यांने घरी जाऊन रोप आणला. दलाच्या जवानांच्या मदतीने तो विहिरीत जवळपास तीस फूट खोल उतरला. तरी देखील मांजरी सापडत नव्हती, आवाज मात्र येत होता. शोधाशोध केल्यानंतर तेव्हा कात्रज येथील तलावातून या विहिरीत पाणी आणण्यासाठी त्या काळी टाकण्यात आलेले तीन पाइप त्याला दिसले. त्या पाइपमध्ये ही मांजर जाऊन बसली होती. शेलारने तिला पकडून बाहेर काढले आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने तो आणि मांजरी दोन्ही सुरक्षित बाहेर आले. तेव्हा वाड्यात जमलेल्या सर्वांचा जीव भांड्यात पडला. 

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी मुलगा पडला सगळ्यांवर भारी! रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय- पॉपस्टार, इतक्या लाखांचं मिळालं बक्षीस

Mumbai News: घरांच्या मालमत्ता करमाफीचा आर्थिक फटका, पाणीपट्टीही बंद; महापालिकेला २०० कोटींचा तोटा!

Mumbai News: मुंबईकरांसाठी नवी मोकळी जागा! ५०० एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करणार; राज्य सरकारची दमदार घोषणा

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

Latest Marathi News Live Update: गोवा आणि कोकणापलीकडेही समाजसेवेचा वारसा

SCROLL FOR NEXT