पुणे

ब्रेक लायनर रिव्हेटिंग मशिनने पीएमपीचे काम होणार अचूक

सकाळवृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या गाड्यांना ब्रेक लायनर बसविण्यासाठी नॉरब्रेमसे या जर्मन कंपनीकडून अत्याधुनिक ब्रेक लायनर रिव्हेटिंग मशिन देण्यात आले आहे, त्यामुळे पीएमपीचे मनुष्यबळ वाचणार असून ब्रेक लायनर बसविण्याच्या कामामध्ये अचूकता येणार आहे.

पीएमपीच्या १३ डेपोंमध्ये २६ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गाड्यांची ब्रेक लायनरची कामे केली जात होती. हे काम हाताने होत असल्याने त्यामध्ये काही वेळेस त्रुटी राहत होत्या. मात्र, ब्रेक लायनर रिव्हेटिंग मशिन पीएमपीकडे दाखल झाल्याने हे काम लवकर आणि अचूकपणे होणार आहे. तसेच प्रशासनाचे मनुष्यबळदेखील वाचणार आहे. शनिवारी (ता. १७) पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्या हस्ते हे मशिन कार्यान्वित करण्यात आले. त्याचबरोबर कंपनीकडून पीएमपीला एक वॉटर कूलर देण्यात आले. या वेळी कंपनीचे मुख्य वितरण व्यवस्थापक अरुण बिस्ट, पीएमपीचे अधिकारी विलास बांदल आदी उपस्थित होते. संबंधित कंपनीने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मशिन चालविण्याचे प्रशिक्षण दिले.

कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. त्यांनी यंत्रणेतील बदल आत्मसात करण्याची गरज आहे.
- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

मशिनचे फायदे
 गाड्यांचे ब्रेक फेलचे प्रमाण घटणार
 कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामध्ये कपात होणार
 लायनरचे काम जलद व अचूक होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT