Bridge demolition start at Pune University Chowk  
पुणे

विद्यापीठ चौकातील "ते' पूल पाडण्यास सुरुवात; असे आहे पूल पाडण्याचे नियोजन

उमेश शेळेके

पुणे : लॉकडाऊनची संधी साधत विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पूल मंगळवारपासून पाडण्यास सुरुवात झाली.  एकावेळी न पाडता तीन टप्प्यात पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे. तीस दिवसात हे पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असून वाहतूक कोंडीची टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. गणेशखिंड रस्त्यावरून ही मेट्रो जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरील पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. त्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तर हे पूल महापालिकेच्या मालकीचे असल्याने ते पाडण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडूनही पीएमआरडीएला "एनओसी' देण्यात आली आहे. 

पुणे विद्यापीठ चौकातील पूल तीन टप्प्यात पाडणार

दरम्यान काल रात्री महापालिका, वाहतूक पोलीस आणि पीएमआरडीचे अधिकारी यांची संयुक्तपणे विद्यापीठाची पाहणी केली. त्यावेळी मंगळवारपासून पूल पाडण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार आज सकाळपासून पूल पाडण्याच्या कामास सुरुवात झाली.
--------------
सचिन पायलट यांच्यासोबत किती आमदार? थेट व्हिडिओ प्रसिद्ध करत दिले उत्तर
--------------
अनेक देशांची चुकीच्या मार्गाने वाटचाल; जागतिक आरोग्य संघटना
--------------
एकावेळी संपूर्ण पूल न पाडता, तीन टप्प्यात ते पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वात कमी वाहतूक असलेल्या चतुशृंगी येथील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेरकडे जाणारा आणि तिसऱ्या टप्प्यात औंधकडे जाणारा पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पीएमआरडीकडून यावेळी सांगण्यात आले. पूल पाडताना वाहतूकीस अडथळा ठरू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच गणेशखिंड रस्त्यावर वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यांची देखील यावेळी पाहणी करण्यात आली. 

असे आहे पूल पाडण्याचे नियोजन 

  • पहिला टप्पात चतुशृंगी येथे उतारणारा व पाषाणकडे जाणारा भाग 
  • दुसरा टप्पा बाणेरकडे जाणारा 
  • तिसरा टप्पा औंधकडे जाणारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात चाललंय काय? आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार; कौटुंबिक, व्यावसायिक संबंध ठेवण्यास बंदी

IPL 2026, RR vs MI: मुंबई इंडियन्सने 'त्या' मॅचविनर खेळाडूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध का खेळवलं नाही? कोचने केला मोठा खुलासा

2,20,00,00,000 इतकी आहे सनी देओलची संपत्ती, मुंबईपासून UK पर्यंत आहेत आलिशान घरं, 100 एकर जमीन आणि बरंच काही

भाईला 'बाई' करू, पुणे डीसीपींचे अजब विधान; लक्षात येताच तिथंच स्पष्ट केलं

BEST Bus: कर्मचारी कमी; मुंबईची लाइफलाइन धोक्यात! बेस्ट बस कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढणार? मोठा निर्णय लवकरच

SCROLL FOR NEXT