Sarpanch 
पुणे

'एक हजारों में मेरी बहना है!'; बहीण सरपंच होताच भावानं दिलं मोठं गिफ्ट!

शरद पाबळे

केसनंद (पुणे) : हवेली तालुक्यातील आष्टापूर गावच्या सरपंचपदी कविता जगताप यांची, तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीतील वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे कविता जगताप यांचे बंधू रामकृष्ण सातव पाटील यांनी आपली बहिण सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना ईनोवा कार भेट देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.  

मंगळवारी (ता.९) आष्टापूर ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. यावेळी सरपंच, उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकेकच अर्ज आला होता. त्यामुळे मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक चव्हाण यांनी सरपंचपदी कविता जगताप यांची, तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे यांनी सहाय्य केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सहभागातून वैशिष्ट्यपूर्ण कामे करणार असल्याचे सरपंच कविता जगताप तसेच उपसरपंच विकास कोतवाल यांनी सांगितले.

भाऊ-बहिणीच्या नात्याचा आदर्श
सध्या शहरालगत वाढते औद्योगीकरण आणि जमिनीच्या वाढत्या बाजारभावामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा येत चालत आहे. असे असताना अष्टापूर गावात मात्र बहीण सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर भावाने त्यांना ईनोवा कार भेट देत भाऊ-बहिणीच्या नात्याचा एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT