BRT Trial Run
BRT Trial Run 
पुणे

बीआरटीचे ट्रायल रन झाले सुरु; पण प्रवाशांचा होतोय गोंधळ

सकाळवृत्तसेवा

कात्रज - दोन दिवसांपूर्वी कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्गाची पाहाणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यासंह केली होती. कामाच्या पाहणीनंतर महापौरांनी १ जानेवारीपासून बीआरटी सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार स्वारगेट कात्रज मार्गावर पीएमपीच्या गाड्यांचे ट्रायल रन सुरु झाले असून काही गाड्या बीआरटीतून सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही गाड्या अधिकतर गाड्या पहिल्याच मार्गावरून जात असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडताना दिसत आहे.

त्याचबरोबर आणखीही काही रिक्षा आणि दुचाकीसारखी खाजगी वाहने बीआरटीतून धूम ठोकताना दिसत आहेत. बीआरटी मार्गावरून पीएमपीची खूपच कमी प्रमाणात वाहतूक सुरु आहे. भारती विद्यापीठ समोर बीआरटीचा एक बसथांबा असून त्याच्या दोन्ही बाजूंनी बस ये-जा करत असल्याचे चित्र सध्या आहे. त्याचबरोबर, कात्रजवरहून जाताना बालाजीनगर येथिल धनकवडी फाटा चौक, अहिल्यादेवी चौक पद्मावती याठिकाणी सामान्य रस्त्याने जाणारी वाहने उजवीकडे वळून बीआरटी मार्गात घुसत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कात्रजन चौकानजीनक असलेल्या मोरेबाग वसंत विहार या बसथांब्यावरही सामान्य वाहने बीआरटी मार्गाचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्येही काही प्रमाणात गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. बस नेमकी बीआरटीतून की पूर्वीच्या मार्गाने जाणार? ही गोष्ट प्रवाशांच्या लक्षात येत नाही.

सध्या ट्रायल रन सुरु असून काही गाड्या बीआरटी मार्गावरून सोडण्यात आल्या आहेत. गाड्या सोडून अडीअडचणींची चाचपणी सध्या करण्यात येत आहे. काही काळातच संपूर्ण गाड्या बीआरटी मार्गाचा वापर करताना दिसून येतील.
- विजय रांजणे, कात्रज आगार व्यवस्थापक 

खूप पूर्वीच बीआरटीचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते. तसे झाले नाही. परंतु, 'देर आये दुरुस्त आये' आता तरी लोकांसाठी बीआरटी फायद्यीची ठरावी ही अपेक्षा आहे. मात्र, तरीही प्रवाशांचा गोंधळ उडालेला दिसत आहे. त्यामुळे महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने चाचपणीचे काम लवकरात लवकर उरकून बीआरटी मार्गातून बसेस सोड्याव्यात आणि प्रवशांचा त्रास कमी करावा.
- महेश कदम, कात्रज

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT