Home_Flats
Home_Flats 
पुणे

पुणे : फ्लॅटधारकाला झालेल्या त्रासाबद्दल बिल्डरला मोजावे लागणार १ लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा

पुणे : करारनाम्यानुसार वेळेत सदनिका न दिल्याने भरलेली रक्कम पुन्हा मिळण्यासाठी आणि सदनिकेच्या व्यवहारामुळे फ्लॅट धारकाला झालेल्या मानसिक तसेच शारीरिक त्रासाबद्दल बिल्डरला एक लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ग्राहकाने दिलेली रक्कम 12 टक्के व्याजाने परत द्यावी लागणार आहे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. बुकिंग व त्यानंतर दिलेले सहा लाख 82 हजार 285 रुपये जुलै 2019 पासून 12 टक्के व्याजाने बिल्डरने ग्राहकाला परत द्यावे, असे आदेशात नमूद आहे. सतीश अप्पा पाटील (रा. शिवणे) यांनी 'एक्‍सल होम्स' यांच्याविरोधात तक्रार केली होती.

पाटील यांनी बिल्डरच्या नऱ्हे आंबेगाव येथील 'शुभंकर' या प्रकल्पात ऑक्‍टोबर 2016 रोजी सदनिका बुक केली होती. करारनाम्याप्रमाणे दोन वर्षात तिचा ताबा देण्याचे ठरले होते. फ्लॅटची किंमत सात लाख 65 हजार निश्‍चित करण्यात आली होती. त्यातील सहा लाख 82 हजार 285 रुपये तक्रारदारांनी बांधकाम व्यावसायिकाला दिले होते. मात्र वेळेत बांधकाम न झाल्याने तक्रारदार यांनी भरलेले पैसे परत मिळण्यासाठी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. बिल्डरला एकूण नऊ लाख 6 हजार 923 रुपये ग्राहकाला द्यावे लागणार आहे.

कर्जाच्या व्याजापोटी सव्वा लाख रुपये द्या :
बुकिंग व फ्लॅटची एकूण रक्कम भरण्यासाठी तक्रारदारांनी यांनी कर्ज काढले होते. मात्र वेळेत ताबा न मिळाल्याने कर्जाचे व्याज वाढतच चालले होते. त्यामुळे व्याजापोटी भरलेले पैसे मिळावे म्हणून तक्रारदारांनी अर्ज केला होता. त्यामुळे तक्रारदार यांना कर्जावरील व्याज व हप्ता यापोटी एक लाख 24 हजार 665 रुपये द्यावे, असा आदेश बिल्डरला दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुणे अपघातातील आरोपींच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर...

Video: 'सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्ती पोहोचला EVM ठेवलेल्या ठिकाणी'; निलेश लंकेंनी व्हिडिओ ट्वीट केल्याने खळबळ

USE vs BAN 1st T20I : अमेरिकेने बांगलादेशला चारली पराभवाची धूळ अन् रचला इतिहास

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Latest Marathi News Live Update: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर

SCROLL FOR NEXT