Crime_Fraud
Crime_Fraud 
पुणे

बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा म्हणाला अन् दीड कोटी रुपयांना चुना लावला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाने दाम्पत्याची दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या संचालकांविरुद्ध न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गौतम जगदीश अहुजा, जगदीश भगवानदास अहुजा (दोघेही रा. सांताक्रूझ, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हरेश गुल सेतपाल आणि त्यांची पत्नी महेक (रा.एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फिर्यादी सेतपाल यांना गौतम आणि जगदीश अहुजा यांच्या 'अहुजा प्रॉपर्टीज असोसिएटस' कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास 12 टक्के व्याज मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. जादा व्याजदर मिळेल, म्हणून सेतपाल यांनी संबंधित कंपनीमध्ये दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र संबंधित कंपनीने सेतपाल यांना कुठल्याही प्रकारचा परतावा दिला नाही. त्यामुळे सेतपाल यांनी वकिलामार्फत न्यायालयामध्ये संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा दावा दाखल केला होता.

न्यायालयाने या प्रकरणात बांधकाम कंपनीचे संचालक अहुजा यांच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले. त्यानुसार ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी), फसवणूक यानुसार अहुजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT