पुणे

भाजप आमदाराच्या नातेवाईकाचा पुण्यात काँग्रेस प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा पुण्यात काँग्रेस प्रवेश झाला.

प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सुत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा पुण्यात काँग्रेस प्रवेश झाला. औंध येथील प्रसिद्ध उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि नानासाहेब गायकवाड यावेळी उपस्थित होते.

प्रदेश युवक काँग्रेसमध्ये गणेश गायकवाड यांना लवकरच मोठो जबाबदारी दिली जाणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले. गायकवाड यांच्या प्रवेशाने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी - चिंचवड मध्ये काँग्रेसला मोठे बळ मिळेल. तसेच, तरुणांमधील गायकवाड यांच्या संपर्काचा काँगेसच्या वाढीसाठी उपयोग होणार असल्याचे पटोले यांनी म्हटलेय. बाधंकाम आणि उद्योग क्षेत्रातील गायकवाड यांच्या प्रतिमेचा देखीलया वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस पक्षाला उपयोग होणार असल्याचे पटोले यांनी म्हटलंय.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक आहेत. विधानसभेच्या 2019 निवडणूकीत भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी गायकवाड प्रयत्नशील होते. त्यामुळे गायकवाड यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपला धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस ही गायकवाड यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीलाही धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT