NanoTechnology 
पुणे

नॅनोटेक्नॉलॉजीद्वारे कोविडची लस शोधणे शक्य; वाचा कुणी केला दावा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शास्त्रज्ञ यावरील तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 2019च्या अखेरीस उद्भवलेल्या सार्स कोविड-2 या विषाणूच्या प्रथिनांची रचना अत्यंत कमी कालावधीत समजून घेण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. दरम्यान कोविड-19 वरील लस निर्मितीसाठी अद्याप प्रयत्न सुरू असताना नॅनोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लस विकसित करणे शक्य असल्याचा दावा 'कॅलिफोर्निया विद्यापीठ सॅन डिएगो' येथील नॅनोइंजिनिअरिंग विभागाच्या संशोधकांनी (नॅनो इंजिनिअर्स) केला आहे.

यामध्ये कोविड 19 साठी लस विकासाच्या सद्य पद्धतींचा आढावा घेत नॅनोटेक्नॉलॉजीच्या आधारावर प्रगत उत्पादनाच्या भूमिकेवर तपशील अभ्यास करण्यात आला आहे. तसेच या अभ्यासाबाबतची माहिती नुकतीच 'नेचर नॅनोटेक्नॉलॉजी' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या अभ्यासानुसार विषाणू आणि नॅनोपार्टीकल्स यांचा आकारसामान्यतः एक सारखा असल्यामुळे विषाणूंना नैसर्गिकरित्या आढळणारे नॅनोमेटेरियल्स म्हणून ओळखले जाऊ शकते. त्यामुळे लसीच्या विकासासाठी आणि 'इम्युनोइंजिनिअरिंग'मध्ये नॅनोटेक्नॉलॉजीचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

तसेच नैसर्गिक किंवा कृत्रिम नॅनोपार्टीकल्स विषाणूच्या संरचनात्मक वैशिष्ट्यांची नक्कल करण्यास सक्षम असतात. तर रासायनिक जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनोकेमिस्ट्री 'नेक्स्ट जनरेशन डिझाइनर' लस तंत्रज्ञानाचा विकास सक्षम करते. लस तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीकोनातून, हा एक नवा तंत्रज्ञान म्हणून वापरला जाऊ शकतो. तसेच वर्तमान आणि भविष्यातील साथीच्या रोगाचा नाश करण्यासाठी वेगाने लस शोधून काढणे, त्याचे अधिकाधिक उत्पादन आणि जागतिक वितरण सक्षम करणे हा या अभ्यासामागचा प्रमुख उद्देश होता.

"विषाणूला नष्ट करण्याकरिता लस निर्मितीसाठी नॅनोपार्टीकल्स यांचा वापर 'डिलिव्हरी एजंट' (वाहक) म्हणून केला जातो. या नॅनोपार्टीकल्सवरती विषाणूचा डीएनए, प्रथिने (प्रोटीन) किंवा आरएनए हे प्रतिजन (अँटिजिन) भरण्यात येतात. तसेच त्यांना लसीच्या माध्यमातून शरीरातील पेशींमध्ये पोहोचवले जाते. या प्रतिजनमुळे शरीरात प्रतिपिंड (अँटिबॉडीझ)च्या निर्मितीस सुरुवात होते आणि ते प्रतिजनच्या विरोधात लढण्यास कार्य करते. तसेच प्रतिजन समवेत या नॅनोपार्टीकल्सवर रोगप्रतिकारशक्तीस चालना देण्यासाठी एक सहायक उत्तेजक एजंट भरून रोगप्रतिकारक पेशींमध्ये पोहचविण्यात येते."
- डॉ. धनंजय बोडस, शास्त्रज्ञ, आघारकर संशोधन संस्था

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नॅनोपार्टीकल्सचा कसा होतो उपयोग?
- याचा वापर प्रतिजन वाहक म्हणून केला जातो. त्यामुळे हे थेट अँटिबॉडी पेशींमध्ये जाऊन पोहोचते आणि प्रतिपिंड निर्मितीस मदत करते.
- तसेच याच्या माध्यमातून अँटिबॉडी पेशींना मोठ्या प्रमाणात प्रतिपिंड निर्माण करण्यास चालना मिळते.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेत पदोन्नतीवरून प्रशासनावर दुजाभावाचा आरोप, आयुक्तांचा खुलासा

Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' फक्त प्रियकर-प्रेयसीसाठी नव्हे, तर कुटुंब अन् मित्रांवरही प्रेम व्यक्त करण्याचा सण!

Valentine Day 2026 Special Recipe: व्हॅलेंटाईन डे ला सकाळी नाश्त्यात पार्टनरसाठी बनवा 'हार्ट शेप सँडविच', नोट करा रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi - कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ ते २० फेब्रुवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

Marriage Counseling : भावनिक संघर्ष आणि सावरण्याचा मार्ग

SCROLL FOR NEXT