Cantonment Court notice to daughter-in-law residential flat house on lease intention of grabbing crime  sakal
पुणे

Pune Crime : सासूचे घर खाली करण्याचा न्यायालयाचा सुनेला आदेश

कॅन्टोन्मेंट न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाडेकरारावर घर घेतलेले असतानाही केवळ सदनिका बळकाविण्याच्या इराद्याने सासूच्या नावावर असलेल्या राहणाऱ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सुनेला न्यायालयाने दणका दिला आहे.

सासूचे घर खाली करण्याचा आदेश न्यायालयाने सुनेला दिला आहे. कॅन्टोमेंट न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन. ओंडारे यांनी हा निकाल दिला. आदेशापासून एक महिन्याच्या आत फ्लॅट खाली करावा.

सासूवर कोणत्याही प्रकारचा घरगुती हिंसाचार करू नये. तसेच फ्लॅटवर ताबा सांगू नये, असे निकालात नमूद आहे. या प्रकरणातील सून शबाना ही आयटीत नोकरीला आहे. तर त्यांचा पती समीर (नावे बदललेली) देखील नोकरदार आहे.

या जोडप्यात वाद सुरू असल्याने पत्नी भाडेतत्त्वावर घर घेऊन राहत आहे. मात्र तीने आपल्याला राहायला घर नाही असे दाखविण्यासाठी सासूच्या नावावर असलेल्या घराचा ताबा घेतला होता. सासू गृहिणी असून सासरे निवृत्त झालेले आहे.


या प्रकरणात सासूने सुने विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची देखील तक्रार दाखल केलेली आहे. सून सासू-सासऱ्यांना त्या घरात घेत नसल्याने सासूने ॲड. भरत मोरे यांच्यामार्फत घराचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

समीरने शबाना यांना दरमहा ४० हजार रुपये पोटगी द्यावी, असा अंतरिम आदेश देखील या प्रकरणात न्यायालयाने दिला आहे. सून राहत असलेला फ्लॅट त्यांना गिफ्ट डिडच्या माध्यमातून मिळाले आहे.

मात्र त्या घरात सासू राहू देत असल्याने आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे घराचा ताबा मिळावा, असे त्यांना दाखल केलेल्या अर्जात नमूद आहे. शबाना यांनी भाडेतत्त्वावर दुसरे घर घेतलेले आहे. वृद्ध सासू-सासऱ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, असा युक्तिवाद ॲड. मोरे यांनी केला.

महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे असून सासू देखील महिलाच आहे. वृद्ध वयात सासू-सासऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने सुनेने सदनिकेवर ताबा मारला होता. सून कमावती आहे. तिला अंतरिम पोटगी मंजूर झालेली आहे. प्रत्यक्षात सून तेथे राहत देखील नाही. तीन भाडेतत्त्वावर घेतलेल्या घराचे कागदपत्र आम्ही सादर केले.
- ॲड. भरत मोरे, अर्जदार सासूचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

Latest Marathi News Live Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT